शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: भारताच्या २६ ठिकाणांवर पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
3
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
4
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
5
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
6
राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
7
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
8
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
9
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
10
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
11
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
12
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
13
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
14
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
15
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
16
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
17
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
18
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
19
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी

राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटलचे मेडिकल करू नका!

By admin | Updated: July 27, 2015 04:04 IST

राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशित कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येणारा रुग्ण हा विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेशातून येणारा गरीब

नितीन गडकरी : डोके व मान कर्करोगावर परिषदनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी प्रादेशित कॅन्सर हॉस्पिटलमध्ये येणारा रुग्ण हा विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेशातून येणारा गरीब मनुष्य असतो. येथे आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी आमची आहे. हे हॉस्पिटल चांगले काम करीत आहे, परंतु याकडे दुर्लक्ष करून याचे ‘मेडिकल’ होऊ देऊ नका, असे कळकळीचे आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्यावतीने जागतिक डोके व मान कर्करोगाच्या दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, लोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘एडिटोरियल बोर्र्ड’चे चेअरमन खा.विजय दर्डा, खा. अविनाश पांडे, आ. सुनील केदार, आ. सुधाकर कोहळे, विभागीय आयुक्त व कॅन्सर रिलीफ सोसायटीचे अध्यक्ष अनुप कुमार, उपाध्यक्ष बसंतलाल शॉ, सचिव अशोक क्रिपलानी आदी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, राष्ट्रसंत तुकडोजी रिजनल कॅन्सर हॉस्पिटलचा विकास साधायचा असेल तर याचे नव्याने बांधकाम होणे आवश्यक आहे. बांधकामाच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेले हफीज काँट्रेक्टर यांच्याकडून प्रस्तावित इमारतीचे बांधकाम प्लॅन करून घ्या. टप्प्याटप्प्याने बांधकाम करा. हॉस्पिटलच्या बांधकामासाठी आणि यंत्रसामग्रीसाठी निधीची कमतरता पडणार नाही. मात्र याचा पाठपुरावा करून हॉस्पिटलनेही पुढाकार घेणे तेवढेच आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. शिक्षणात जीवघेण्या रोगांची माहिती द्यावीखा. दर्डा म्हणाले, देशात मधुमेह, हृदयविकार आणि कॅन्सर हे जीवघेणे आजार वाढत आहे. या आजाराच्या माहितीचा अंतर्भाव शिक्षणात केला तर त्यांच्यात जागृती होऊन व्यसनांचे गंभीर परिणाम विद्यार्थ्यांच्या लक्षात येतील. ते व्यसनांपासून दूर राहतील व आजाराला प्रतिबंध बसेल.देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत सुमारे ३०० आरोग्य केंद्र आहेत. परंतु यातील ४० टक्के केंद्रामध्ये सोयी उपलब्ध नाहीत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ६०० अद्ययावत केंद्रांची गरज असून राष्ट्रस्तरावर कॅन्सरबाबत जागरुकता निर्माण करायला हवी, असेही ते म्हणाले. या हॉस्पिटलसाठी आवश्यक बाबी पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. संचालन किशोर गलांडे यांनी केले तर आभार अशोक क्रिपलानी यांनी केले. कार्यक्रमाला आँकोलॉजी अ‍ॅण्ड रिसर्चचे संचालक डॉ. पूरविश पारेख, शासकीय दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनय हजारे, प्रसिद्ध सर्जन डॉ. मदन कापरे, आयएमएचे अध्यक्ष डॉ. अजय काटे, सचिव डॉ. सरिता उगेमुगे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, मनपा सभापती सारिका नांदुरकर, डॉ. बी. के. शर्मा व इतर मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)बाईचा माणूस, माणसाची बाई करण्यास पालकमंत्री समर्थ४यावेळी गडकरी यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले. कुठलेही काम तडीस नेण्यास पालकमंत्री बावनकुळे यांचा हातखंडा आहे. अगदी बाईचा माणूस, माणसाची बाई करण्यास देखील ते समर्थ आहे असे गडकरी यांनी म्हणताच सभागृहात हंशा पिकला. या हॉस्पिटलच्या विकासासाठी आ.केदार, आ.कोहळे आणि पालकमंत्री बावनकुळे यांनी लक्ष घालण्याच्या सूचनाही गडकरी यांनी केल्या. कॅन्सरच्या मृत्यूची संख्या वाढली सहा टक्क्याने ४खा. दर्डा म्हणाले, कॅन्सरला खूप जवळून पाहिले आहे. कर्करोगाच्या वेदना काय असतात, त्या अनुभवल्या आहेत. यावर सर्वांनी मिळून काम करायला हवे. कारण याची आकडेवारी फार भयावह आहे. इंडियन मेडिकल कौन्सिल आणि कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या आकडेवारीनुसार २०१२ व २०१४ मध्ये कॅन्सरमुळे मरणाऱ्यांची संख्या सहा टक्क्याने वाढली आहे. २०१४ मध्ये ४ लाख ९१ हजार ५९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. म्हणजेच रोज साधारण १३०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू कॅन्सरमुळे होत आहे. २०१५ मध्ये साडेनऊ ते दहा लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. धक्कादायक म्हणजे, जगातील ३० टक्के कॅन्सरचे रुग्ण एकट्या भारतात आहेत. यातही ३० टक्के रुग्ण हे डोके व मानेच्या कॅन्सरचे आहे तर ३० टक्के रुग्ण हे तोंडाच्या कॅन्सरचे आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे बदलती जीवनशैली तसेच व्यसनांमुळे युवा वर्गात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे.