शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

‘उमेद’च्या महिला व कर्मचाऱ्यांना नाउमेद करू नका, अन्यथा.. दिला 'हा' इशारा

By गणेश हुड | Updated: July 20, 2023 13:25 IST

वेळोवेळी आश्वासने देवूनही मागण्यांकडे दुर्लक्षच

 नागपूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अंतर्गत उमेद महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या विविध मागण्या मागील काही  वर्षापासून प्रलंबित आहेत. शासनाने वेळोवेळी आश्वासने देवूनही अद्याप मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. ‘उमेद’च्या महिला व कर्मचाऱ्यांना नाउमेद करू नका, न्याय न मिळाल्यास २५ जुलैला मुंबई येथे  मोर्चा काढण्याचा इशारा उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने दिला आहे.

२७ मार्च २०२३ रोची संघटनेच्या शिष्टंमळाला मुख्यमंत्र्यांनी उमेद महिला व कर्मचाऱ्यांच्या मागण्या लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर १७ मे २०२३ रोजी ग्रामविकास मंत्र्यांनी महिना भरात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. परंतु मागण्या मान्य न झाल्याने २१ जून रोजी पुन्हा संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले असता आठवडाभरात मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. वेळोवेळी आश्वासने दिल्यानंतरही मागण्या मान्य होत नसल्याने २५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याचा इशारा, संघटनेचे नागपूर जिल्हा अध्यक्ष अमोल बाविस्कर यांनी दिला  आहे. मार्चात राज्यातून लाखो कर्मचारी सहभागी होणार असल्याचे बाविस्कर यांनी सांगितले. 

अशा आहेत मागण्या

-उमेद अभियानात कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींना राहेयो प्रमाणे ३० दिवसाचे मासिक मानधन देण्यात यावे. -मानधन महिन्याच्या १० तारखेपर्यंत वितरित करण्यात यावे.बंदी उठवून १०० टक्के गावात केडर निवड करण्यात यावी.-अभियानातील सर्व कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ करावी. ग्रामविकास विभागाने कडर निर्माण करून शासकीय सेवेत घ्यावे.-एमएसआरएलएम च्या मनुष्यबळ संसाधन मार्गदर्शक सूचनानुसार रिक्त , नवीन जागांवर पदभरती घ्यावी. -प्रभाग समन्वयक, सहाय्य कर्मचाऱ्यांनी विनंतीनुसार जिल्हा अंतर्गत व जिल्हाबाह्य बदली करण्यात यावी. -कोविड काळातील वेतनवाढ देण्यात यावी.

टॅग्स :Employeeकर्मचारीGovernmentसरकार