शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विश्व वंदनीय शिवरायांना हिंदुत्वाच्या चौकटीत बांधू नका : पुरुषोत्तम खेडेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 21:05 IST

शिवाजी महाराजांना आज काही लोक हिंदू धर्माभिमानी व मुस्लीमद्वेष्टा ठरवत आहेत. त्यांना मराठी व महाराष्ट्राच्या चौकटीत बंदिस्त करीत आहेत. विश्व वंदनीय शिवरायांना अशा छोट्या चौकटीत बांधणे म्हणजे त्यांचा अपमान करणे होय, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठातर्फे शिवाजी जयंतीनिमित्त व्याख्यान

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘शिवमुद्रे’त नमूद असल्याप्रमाणे जिजाऊ मातेने शिवाजी महाराजांना ‘जगाला वंदनीय ठरेल असे स्वराज्य निर्माण करा’ असे आवाहन केले होते. महाराजांनीही तोच आदर्श ठेवत स्वराज्य निर्माण केले. त्यांच्या स्वराज्यात सर्व धर्मीयांना समान स्थान होते. स्त्रियांचा सन्मान सर्वोच्च होता. सर्वांना समान आर्थिक वाटा मिळेल असे त्यांचे धोरण होते. त्यांचे राज्य खऱ्या अर्थाने जगाला आदर्श ठरावे असे होते. मात्र आज काही लोक त्यांना हिंदू धर्माभिमानी व मुस्लीमद्वेष्टा ठरवत आहेत. त्यांना मराठी व महाराष्ट्राच्या चौकटीत बंदिस्त करीत आहेत. विश्व वंदनीय शिवरायांना अशा छोट्या चौकटीत बांधणे म्हणजे त्यांचा अपमान करणे होय, असे मत मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘शिवाजी महाराज आणि वर्तमान स्थिती’ विषयावर आयोजित व्याख्यानात वक्ता म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थ विनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले व कुलसचिव डॉ. पूरणचंद्र मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते. अ‍ॅड. खेडेकर यांनी शिवरायांच्या त्यावेळच्या कर्तृत्वाचे दाखले देत आज ते असते तर त्यांनी ही परिस्थिती कशी हाताळली असती, हा आशावाद मांडला. वर्तमान परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. ‘क्षमता असेल तो टिकेल’ हा डार्विनचा सिद्धांत आज लागू पडतो. सूत्र आणि शास्त्र हे यशाचे तंत्र झाले आहे. भारतीयांची परिस्थिती त्यापेक्षा बिकट आहे. धार्मिक वादविवाद, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारीचा प्रश्न बिकट झाला आहे. शिवाजी महाराज असते तर या समस्या नसत्या.आज शिक्षणाच्या नावाने पदवी घेऊन चालत नाही तर ‘अप्लाईड नॉलेज’ व संशोधनाच्या गुणवत्तेला महत्त्व आहे. महाराज असते तर त्यांनी शिक्षणाची अशी व्यवस्था निर्माण केली असती. त्यांच्या राज्यात व्यसनावर बंदी असती. माध्यमांमध्ये सतत येणाऱ्या बलत्काराच्या बातम्यांनी भीतीचे वातावरण निर्माण करून महिलांना पुन्हा घराच्या भिंतीत बंदिस्त करण्याचा प्रयत्न होत आहे. स्त्रियांचा सन्मान सर्वोच्च मानणाऱ्या शिवरायांच्या राज्यात स्त्रिया कोणत्याही वेळी बिनदिक्कतपणे वावरू शकल्या असत्या. त्यांनी आपल्या मावळ्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली. त्यामुळे ते असते तर अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये कर्तव्यनिष्ठा असती.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८