शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ढोंगी बुवांचे अंधानुकरण नको; विष्णू कोकजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 19:57 IST

ढोंगी बुवांचे अंधानुकरण समाजाने टाळले पाहिजे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे नवनिर्वाचित आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केले.

ठळक मुद्देआसाराम बापूच्या शिक्षेचे विहिंपने केले स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी आसाराम बापूला सुनावण्यात आलेल्या शिक्षेचे विश्व हिंदू परिषदेतर्फे स्वागत करण्यात आले आहे. आसाराम बापूसारखे लोक लोकांच्या भावनांचा फायदा उचलतात. याचा धर्म व समाजावर परिणाम होतो. अशा प्रकारच्या ढोंगी बुवांचे अंधानुकरण समाजाने टाळले पाहिजे, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे नवनिर्वाचित आंतरराष्ट्रीय अध्यक्ष विष्णू कोकजे यांनी केले. विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर विष्णू कोकजे प्रथमच नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.आसाराम बापूसारखे लोक संन्यासी बनण्याचे ढोंग करतात. विकृतीतून ते कुकर्म करतात आणि लोक सगळ्याच धर्मगुरू व संन्याशांकडे त्याच नजरेने पाहू लागतात. निष्ठेने सेवाकार्य करणाऱ्यांचा विश्वास डळमळतो. मात्र सर्वच धर्मगुरू असे नसतात. काही लोकांमुळे हिंदू धर्म बदनाम होतो. आसाराम बापूला झालेली शिक्षा ही इतर ढोंगी बुवांसाठी एक इशारा आहे. या शिक्षेमुळे अशा लोकांवर वचक बसेल, असा विश्वास विष्णू कोकजे यांनी व्यक्त केला. यावेळी ‘सोशल मीडिया’वर हिंदू समाजावर चिखलफेक करण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा त्यांनी आरोप केला. देशातील काही लोक हिंदू समाजाविरोधात षड्यंत्र रचताना दिसून येत आहेत. यातूनच भगवा दहशतवाद यासारख्या शब्दाचा जन्म झाला. मात्र हे षड्यंत्र फार वेळ टिकणार नाही. जनता आता समजूतदार झाली आहे. अशा दुष्प्रचाराला ते बळी पडणार नाहीत. हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न करून आपली राजकीय पोळी शेकणाऱ्यांचे चेहरे जनतेसमोर आले आहेत, असे म्हणत त्यांनी काँग्रेस व डाव्या पक्षांचे थेट नाव न घेता टीकास्त्र सोडले.तोगडियांबाबत सावध पवित्राविहिंपचे माजी आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांच्याबद्दल विष्णू कोकजे यांनी सावध भूमिका घेतली. तोगडिया नेमके काय करत आहेत, याच्याशी आमचा संबंध नाही. ते वंदनीय आहेत व त्यांच्याबाबत बोलणे योग्य होणार नाही. आमच्या संस्कारांमध्ये अशा बाबी बसतदेखील नाही, असे विष्णू कोकजे यांनी स्पष्ट केले.राममंदिराचा निर्णय हिंदूंच्याच बाजूने येणारयावेळी विष्णू कोकजे यांनी राममंदिर लवकरच निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त केला. अयोध्येच्या वादग्रस्त जागेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे. आम्हाला न्यायालयाच्या निष्पक्षतेवर पूर्ण विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालयातून हिंदूंच्याच बाजूने निर्णय येईल, असे ते म्हणाले.संघ परिवारातील पदाधिकाऱ्यांशी चर्चाविष्णू कोकजे यांनी सर्वात अगोदर संघ स्मृतिमंदिराला भेट दिली. त्यानंतर संघ मुख्यालयात जाऊन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी चर्चा केली. दुपारी १.३० वाजताच्या सुमारास धंतोली येथील अहल्या मंदिरात संघ परिवाराशी जुळलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत विहिंपचे कार्याध्यक्ष अलोक कुमार, महामंत्री मिलिंद परांडे, संघटन महामंत्री विनायक देशपांडे, उपाध्यक्ष चंपत राय हे प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ