शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

माझ्या तक्रारी माझ्यासमोर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:20 IST

विरोधक समोरचा असेल तर कधीही चालतो. पण पक्षांतर्गत माझ्यावर कुणाची नाराजी असेल तर त्यांनी ती पक्षाच्या व्यासपीठावर मांडली पाहिजे.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांचे खडेबोल : पक्षशिस्त असलीच पाहिजे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विरोधक समोरचा असेल तर कधीही चालतो. पण पक्षांतर्गत माझ्यावर कुणाची नाराजी असेल तर त्यांनी ती पक्षाच्या व्यासपीठावर मांडली पाहिजे. मात्र, पक्षशिस्त असलीच पाहिजे. माझ्या तक्रारी माझ्या समोरच करा. माझ्याकडे येऊन करा. आधी आपला जिल्हा, मतदारसंघ सांभाळा. निकाल द्या. मग इतर बाबींचे बोला, असे खडेबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पक्षांतर्गत विरोधकांना सुनावले.नांदेड महापालिकेतील विजयानंतर खा. अशोक चव्हाण यांचे सोमवारी सकाळी नागपूर विमानतळावर आगमन झाले. या वेळी त्यांचे काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश यांच्यासोबत ते यवतमाळसाठी रवाना झाले. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलताना चव्हाण यांंनी पक्षांतर्गत गटबाजीवर कटाक्ष केला. काही दिवसांपूर्वी चव्हाण यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करीत काही नेत्यांनी दिल्लीत त्यांची तक्रार केली होती. याबाबत विचारले असता ते म्हणाले, मी स्वत: गट-तट मानत नाही. पक्षांतर्गत बाबींवर चर्चेतून मार्ग निघू शकतो. मी पदावर असेपर्यंत पक्ष बळकट करण्यावरच भर देणार. माझ्यासाठी पक्ष महत्त्वाचा आहे. मला निकालात रस आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेत नगरसेवकांची पळवापळवी सुरू झाली आहे. भाजपाने देशभरात सत्तेसाठी पळवापळवीचे उद्योग केले. पक्षांतर बंदी कायदा तर धुडकावून लावला. आता तेच शिवसेना करीत आहे. हे प्रकार लोकशाहीसाठी मारक आहेत. अजित पवार यांनी केलेल्या प्रशंसेबाबत विचारले असता ते म्हणाले, माझ्या मंत्रिमंडळात पवार हे मंत्री होते. भाजपाचा सफाया झाल्याचा त्यांना आनंद झाला आहे. ही चांगली बाब आहे.नागपुरात नेत्यांचे समीकरण बसविणारनागपुरातही नेत्यांचे समीकरण बसविता आले असते तर मला अधिक आनंद होईल. गरज भासली तर त्यासाठी पुढाकार घेण्याची आपली तयारी आहे. मला कुणालाही प्रमोट करायचे नाही किंवा कुणाचीही बाजू घ्यायची नाही. नागपुरात गटबाजीचा इतिहास फार जुना आहे. कोणत्याही प्रदेशाध्यक्षासाठी हे काही नवीन नाही. कुणाची नाराजी असेल तर त्यांनी आपल्याशी चर्चा करावी. आपण चर्चेला सदैव तयार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.भाजपचा परतीचा प्रवास सुरूगेल्या निवडणुकीच्या वेळी देशात मोदी लाट होती. भाजपाने केलेल्या अपप्रचाराला व दिलेल्या खोट्या आश्वासनांना जनता बळी पडली. मात्र, आता काँग्रेस बरी असल्याची जाणीव लोकांना झाली आहे. नांदेड, गुरुदासपूरच्या निकालाने लोकांना काँग्रेसकडून अपेक्षा असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, भाजपाचा सामना करण्यासाठी काँग्रेसला जोरात तयारी करावी लागेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. नोटाबंदी, जीएसटी, कर्जमाफी, महागाई आदी मुद्यांवर सामान्य जनता त्रस्त आहे. ज्या गुजरातने भाजपाला डोक्यावर घेतले होते तेथील व्यापारी आता रस्त्यावर उतरले आहेत. भाजपचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.आणीबाणी लावण्याचा प्रयत्नसोशल मीडियाला हाताशी धरून भाजपा सत्तेवर आली. आता तेच हत्यार त्यांच्यावर उलटले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर बंदी घालून अप्रत्यक्षपणे आणीबाणी लावण्याचे प्रयत्न होत आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे.नागपुरात जंगी स्वागतप्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे नागपूर विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. यावेळी चव्हाण यांचा जयघोष करण्यात आला. अनंतराव घारड, प्रदेश सरचिटणीस डॉ. बबनराव तायवाडे, विशाल मुत्तेमवार, मुन्ना ओझा, उमाकांत अग्निहोत्री, अभिजित वंजारी, संजय महाकाळकर, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, दीपक वानखेडे, गिरीश पांडव, राकेश पन्नासे, कमलेश चौधरी, बंटी शेळके, विवेक निकोसे, आकाश तायवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यानंतर चव्हाण रविभवन येथे आले असता तेथेही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गर्दी केली. मॉर्निंग वॉक क्लब व ज्येष्ठ नागरिक मंडळानेही काँग्रेसच्या विजयासाठी चव्हाण यांचे स्वागत केले. इतर पक्षातील काही कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.