शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

घाण कराल तर दंड भरा : नागपुरात १७ डिसेंबरपासून अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:56 IST

शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. याचा विचार करता शहरातील हॉटेल वा लॉनमधून दररोज १०० किलोग्रॅमहून अधिक कचरा निघत असल्यास संबंधित व्यावसायिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. तसेच रस्ते, सार्वजनिक ठिकाणी, घाण करणे, लघवी करणे, उघड्यावर शौच करणे वा थुंकणाऱ्यांवर १७ डिसेंबरपासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

ठळक मुद्देमोठ्या हॉटेल्सना कचरा विलगीकरण बंधनकारक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. याचा विचार करता शहरातील हॉटेल वा लॉनमधून दररोज १०० किलोग्रॅमहून अधिक कचरा निघत असल्यास संबंधित व्यावसायिकांना ओला व सुका कचरा वेगवेगळा संकलित करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. तसेच रस्ते, सार्वजनिक ठिकाणी, घाण करणे, लघवी करणे, उघड्यावर शौच करणे वा थुंकणाऱ्यांवर १७ डिसेंबरपासून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.फेब्रुवारी महिन्यात स्वच्छता अभियानाचे पथक नागपूर शहराच्या सर्वेक्षणासाठी येणार आहे. तत्पूर्वी कचरा विलगीकरणाची प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृती सुरू आहे. रस्ते, सार्वजनिक ठिकाणांवर लघवी करणे, थुंकणे वा उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांना दंड आकारला जाणार आहे. यासाठी झोन स्तरावर प्रत्येकी तीन पथके गठित करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.शहरात कचऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अस्वच्छता निर्माण होत असून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. याचा विचार करता घनकचरा नियम २०१६ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यांची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.कचऱ्याचे वर्गीकरण बंधनकारकघनकचरा व्यवस्था अधिनियम-२०१६ अन्वये सर्व घराघरातून संकलित केला जाणारा कचरा ओला व सुका वर्गीकृत करून घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार नागरिकांनी घरात जमा होणारा कचरा ओला व सुका वर्गीकृत करून महापालिकेने नियुक्त केलेल्या एजन्सीला द्यावा. विलगीकरण न केल्यास १७ डिसेंबरनंतर सफाई कर्मचारी कचरा स्वीकारणार नाही. तसेच मोठ्या हॉटेल्सनी कचरा विलगीकरण करून ओल्या कचऱ्याची स्वत: विल्हेवाट लावायची आहे.शहरात अशी ४० ते ४५ हॉटेल्स आहेत. हॉटेलमधील फक्त सुका कचरा सफाई कर्मचारी संकलित करणार आहेत. याबाबत वृत्तपत्रातून जाहिराती देण्यात आलेल्या आहेत.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाOrder orderआदेश केणे