शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

डी.के. देशमुख यांच्यावरील अवमानना कारवाई रद्द

By admin | Updated: September 15, 2015 06:06 IST

आदेशाच्या अनादर प्रकरणात वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करून क्षमा मागण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या

नागपूर : आदेशाच्या अनादर प्रकरणात वैयक्तिक प्रतिज्ञापत्र सादर करून क्षमा मागण्यात आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी प्रवेश नियंत्रण समिती (वैद्यकीय आणि उच्च व तंत्र शिक्षण) अध्यक्ष व सेवानिवृत्त न्यायमूर्ती डी.के. देशमुख (मुंबई उच्च न्यायालय) आणि समितीच्या सदस्यांवरील अवमानना कारवाई रद्द केली.उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कारंजा लाड येथील विद्यार्थिनी प्रांजली इहरेला अमरावती येथील सिपना महाविद्यालयातील ‘एम. ई. (डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स)’ अभ्यासक्रमात प्रवेश देण्यात आला होता. उच्च व तंत्र शिक्षण संचालकांनी प्रवेशाला मान्यता प्रदान केली होती. परंतु प्रवेश नियंत्रण समितीने १५ आॅगस्टनंतर प्रवेश देता येणार नसल्याचे कारण सांगून प्रवेशाचा प्रस्ताव फेटाळला होता. परिणामी प्रांजलीने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. न्यायालयाने समितीला कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले होते. पुरेसा वेळ देऊनही या आदेशाचे पालन झाले नाही म्हणून न्यायालयाने समिती अध्यक्ष व सदस्यांना अवमानना नोटीस बजावली होती. ही नोटीस मागे घेण्यात आली आहे. तसेच प्रांजलीचा प्रवेश सुरक्षित झाल्यामुळे न्यायालयाने ही रिट याचिका निकाली काढली आहे. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. तुषार ताथोड यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)अशी आहे पार्श्वभूमीप्रांजलीने सिपना महाविद्यालयातून ‘बी. ई. (इन्स्ट्रूमेन्टेशन)’ पदवी मिळविल्यानंतर ‘एम. ई.’ करण्यासाठी ‘गेट’ परीक्षा दिली. तिला नागपूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमध्ये ‘एम. ई. (एम्बेडेड सिस्टम अ‍ॅन्ड कॉम्प्युटिंग)’ शाखेत प्रवेश मिळाला. यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ‘एम. ई. (एम्बेडेड सिस्टम अ‍ॅन्ड कॉम्प्युटिंग)’ अभ्यासक्रमासाठी ‘बी. ई. (इन्स्ट्रूमेन्टेशन)’ पदवी पात्रता निकष नसल्याचे कारण सांगून प्रांजलीचा परीक्षा अर्ज नामंजूर केला. परिणामी तिने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. प्राथमिक सुनावणीनंतर उच्च न्यायालयाने अन्य महाविद्यालयात जागा रिक्त असल्यास प्रवेश स्थानांतरित करण्यात येईल असे सांगितले होते. योगायोगाने सिपना महाविद्यालयातच ‘एम. ई. (डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स)’ अभ्यासक्रमाची जागा रिक्त मिळून आल्यामुळे प्रांजलीला स्थानांतरित करण्यात आले. असे असतानाही प्रवेश नियंत्रण समितीने प्रवेशाचा प्रस्ताव फेटाळला होता. परिणामी प्रांजलीने दुसऱ्यांदा उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.