शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
3
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
4
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
5
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
6
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
7
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
8
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
9
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
10
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
11
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
12
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
13
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
14
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
15
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
16
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
17
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
18
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
19
गेली कबुतरे कुणीकडे? दाणे विक्रेत्यांनीही गाशा गुंडाळला; दादरचा कबुतरखाना पूर्णपणे बंद
20
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश

दिवाळीच्या ट्रॅफिकचा डोक्याला ताप, रविवारपासून सिताबर्डीत वाहनांना ‘नो एन्ट्री’

By योगेश पांडे | Updated: November 3, 2023 18:28 IST

बाजारपेठांमधील वाहतूक कोंडी टाळण्याचे पोलिसांसमोर आव्हान : इतवारीतील वाहतूक वळविणार

नागपूर : दिवाळीच्या तोंडावर शहरातील बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होत असून, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याचे चित्र आहे. विशेषत: पंचशील चौकाजवळील पूल तुटल्यामुळे वाहतूकीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सीताबर्डी बाजारात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याशिवाय इतवारीतील अनेक मार्गांवर ‘वन वे’ राहणार आहे. वाहतूक पोलिसांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. रविवार पाच नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत हे नियम पाळणे अनिवार्य राहणार आहे.

दिवाळीच्या खरेदीसाठी सितबार्डी, इतवारी, महाल या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. बेशिस्त वाहतूक व पार्किंगमुळे कोंडी होत आहे. त्यामुळे ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सीताबर्डी बाजारात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशाला बंदी घालण्यात आली आहे.

- येथे वाहनांना नो एन्ट्री

हनुमान गल्ली ते व्हेरायटी चौक, सीताबर्डी मुख्य मार्ग, मोदी क्रमांक एक, दोन व तीन

- येथे राहणार ‘वन-वे’

शहीद चौक ते मस्कासाथ चौक, तीननल चौक ते शहीद चौक, नंगा पुतळा चौक ते टांगास्टॅंड, सेंट्रल एव्हेन्यू ते गांधीबाग

- अशी वळविली आहे इतवारीतील वाहतूक

शहीद चाैकमधून किराणा ओळीमार्गे मस्कासाथ चौकाकडे जाणारे सायकल रिक्षा, दुचाकी, वाहने शहीद चौकातून डावे वळण घेऊन तीननल चौकातून भारतमाता चौकाच्या मार्गाने जातील किंवा शहीद चौकातून उजवे वळण घेऊन जुना मोटर स्टॅन्ड चौक या मार्गाने जातील.तीननल चौकामधून जुना भंडारा रोडमार्गे शहीद चौकाकडे जाणारे सायकल रिक्षा, दुचाकी, वाहने तीननल चौकातून डावे वळण घेऊन नंगा पुतळा चौक या मार्गाने जातील.

- मालवाहतूक रात्री करावी लागणार 

निर्देशांनुसार इतवारीतील दुकानात मालवाहतूक करणाऱ्या थ्री व्हिलर व फोर व्हिलर वाहनांतून रात्री ११ ते सकाळी ८ या वेळेत मालाची ने-आण करावी लागेल. तसेच इतवारी शहीद चौक, मस्कासाथ, किराणा ओळी, सोना-चांदी दुकानदार तसेच इतर दुकानदार यांनी फोर व्हिलरचा वापर न करता दुचाकी वाहनांचा वापर करावा अशी सूचना करण्यात आली आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीSitabuldi square Nagpurसीताबर्डी चौकDiwaliदिवाळी 2023nagpurनागपूर