शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

आली दिवाळी; आज वसुबारस, धनत्रयोदशी व गुरुद्वादशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 10:53 IST

धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी धनाची पूजा केली जाते. धणे व गूळ यांचा नैवेद्य दाखविला जातो.

नागपूर : शुक्रवारी दीपोत्सवाचा दुसरा दिवस असून, सूर्यास्ताच्या वेळी वत्सासमान जिचा वर्ण आहे, अशा सवत्स गाईचे पूजन करून तिच्या पायावर तांब्याच्या पात्राने अर्घ्य देऊन... ‘क्षिरोदार्णवसुभूते सुरासुरनमस्कृते, सर्वदेवमय मातर्गृहाणार्घ्य नमोस्तु ते’ हा मंत्र म्हणावा व नंतर गाईला उडिद आदींचे वडे वगैरे खाण्यास देऊन ‘सर्वदेवमये देवी सर्वदेवैरलंकृते, मातर्ममाभिलषितं सकलं कुरू नंदिनी’ हा मंत्र म्हणून प्रार्थना करावी, असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.या दिवशी तळलेले तसेच गाईचे दूध, तूप, दही व ताक वर्ज्य करावे. उडिदमिश्रित अन्नाचे भोजन, भूमीवर शयन करावे तसेच याच द्वादशीला आरंभ करून पाच दिवसापर्यंत पूर्वरात्री निरांजनाचा विधी करावा. धनत्रयोदशी याच दिवशी असल्यामुळे, संध्याकाळी कणकेचा दिवा दक्षिण दिशेला ज्योती करून लावावा. दिव्याची पूजा करावी आणि ‘मृत्यूनां पाशदंडाभ्यां कालेन श्यामयाहस, त्रयोदश्यां दीपदानात सूर्याज: प्रतितां मम’ हा मंत्र म्हणावा आणि नंतर दक्षिणेला तोंड करून यमदेवतेला नमस्कार करावा. गणपती, कृष्णाची उपासना करावी. त्यामुळे, अपमृत्यू टळतो, असे शास्त्र सांगत असल्याचे वैद्य म्हणाले.धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी धनाची पूजा केली जाते. धणे व गूळ यांचा नैवेद्य दाखविला जातो. या दिवशी दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्रीनृसिंहसरस्वती महाराजांनी नरसोबावाडीहून गाणगापूरसाठी प्रस्थान केले.या दिवशी सकाळी ९.३० ते ११ ही अमृत वेळा व दुपारी १२.३० ते २ वाजतापर्यंत शुभवेळा आहे. या काळात वहीखाते, वस्त्रे, अलंकार, भांडी, मौल्यवान वस्तू खरेदी करणे लाभदायक आहे. हा अत्यंत शुभदिवस असून, दिनमान सकारात्मक व सौम्य आहे. करडा, पांढरा, निळसर रंग आरोग्यदायक राहील. दिवसावर २, ६, ७ या अंकांचा प्रभाव राहील. पित्तप्रवृत्ती असणाऱ्यांनी काळजी घेण्याचे आवाहन डॉ. अनिल वैद्य यांनी केले.

टॅग्स :Diwaliदिवाळी