शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

भावी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यामुळे नागपूर विधी क्षेत्रात दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2019 19:47 IST

नागपूरचे सुपुत्र न्या. शरद अरविंद बोबडे हे देशाचे पुढील सरन्यायाधीश होणार असल्यामुळे, नागपूर विधी क्षेत्रात दिवाळीसारखा आनंद साजरा केला जात आहे.

ठळक मुद्देप्रतिष्ठा शिखरावर पोहचवली : विधिज्ञांनी प्रतिक्रियांतून व्यक्त केला अभिमान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरचे सुपुत्र न्या. शरद अरविंद बोबडे हे देशाचे पुढील सरन्यायाधीश होणार असल्यामुळे, नागपूर विधी क्षेत्रात दिवाळीसारखा आनंद साजरा केला जात आहे. न्या. बोबडे यांनी श्रीमंत परंपरा लाभलेल्या नागपूर विधी क्षेत्राची प्रतिष्ठा शिखरावर पोहचवली आहे. त्यामुळे यासंदर्भात ‘लोकमत’ने नागपूरकर विधिज्ञांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता सर्वांनी अभिमानास्पद विचार व्यक्त केले.न्या. बोबडे विदर्भाचे भूषणन्या. शरद बोबडे विदर्भाचे भूषण आहेत. ते उत्कृष्ट वकील होते. त्यानंतर त्यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणूनही सर्वोत्तम कार्य केले. ते देशाचे दुसरे नागपूरकर सरन्यायाधीश असणार आहेत. त्यांच्यामुळे नागपूर विधी क्षेत्राची प्रतिष्ठा उंचावली आहे. त्यांना सामाजिक प्रश्नांची सखोल जाण आहे. त्यांचे कार्य सर्वांसाठी अभिमानास्पद ठरेल, असा विश्वास आहे.अ‍ॅड. शशिभूषण वहाणे, ज्येष्ठ वकील, हायकोर्ट.आदर्श निर्माण केलान्या. शरद बोबडे यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणे ही अतिशय आनंदाची व गर्वाची बाब आहे. विशेषत: न्या. बोबडे यांच्यामुळे नवीन वकिलांपुढे आदर्श निर्माण झाला आहे. कर्तृत्व सिद्ध केल्यास न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदापर्यंत पोहचता येऊ शकते, याची प्रेरणा त्यांच्याकडून वकिलांना सतत मिळत राहील. त्यांच्यामुळे नागपूर विधी क्षेत्राची मान आणखी उंचावली आहे.अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, ज्येष्ठ वकील, हायकोर्ट.न्या. बोबडे यांच्यावर अभिमानन्या. शरद बोबडे यांच्यावर अभिमान आहे. न्या. मोहम्मद हिदायतुल्ला यांच्यानंतर न्या. बोबडे यांच्या रूपाने दुसरे नागपूरकर विधिज्ञ देशाचे सरन्यायाधीश होणार आहेत. ते ५२३ दिवस सरन्यायाधीशपदी कार्य करणार आहेत. दरम्यान, ते आपल्या कार्याने नागपूरचे नाव आणखी उंचावर नेतील, असा विश्वास आहे. त्यांची आतापर्यंतची कारकीर्द गर्व करावा, अशी राहिली आहे.अ‍ॅड. राजेंद्र डागा, प्रसिद्ध फौजदारी वकील, हायकोर्ट.सरन्यायाधीशपदासाठी योग्य व्यक्तीन्या. शरद बोबडे हे सरन्यायाधीशपदासाठी योग्य व्यक्ती आहेत. ते नागपूरकर असल्यामुळे नागपूर विधी क्षेत्राचा सन्मान वाढला आहे. न्या. बोबडे यांनी वकिली व्यवसायात असताना जमीनस्तरापासून कार्य केले. त्यांनी सर्व प्रकारची प्रकरणे हाताळली. विशेष म्हणजे, त्यांच्याकडे आध्यात्मिक बैठक व सामाजिक दृष्टिकोन आहे. त्याचा लाभ देशाला होईल.अ‍ॅड. पद्मा चांदेकर, अध्यक्ष, विदर्भ लेडी लॉयर्स असोसिएशन.अभिमानाची बाब आहेन्या. शरद बोबडे यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणे नागपूरसाठी अभिमानाची बाब आहे. ते या पदाकरिता सर्व बाबतीत पात्र व्यक्ती आहेत. त्यांनी सर्वांसाठी आदर्श निर्माण केला आहे.अ‍ॅड. सुबोध धर्माधिकारी, वरिष्ठ वकील, हायकोर्ट.स्वागतार्ह नियुक्तीन्या. शरद बोबडे यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. ते या पदाकरिता सर्व बाबतीत पात्र व्यक्ती आहेत. त्यांच्यामुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणे सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.अ‍ॅड. सुनील मनोहर, वरिष्ठ वकील, हायकोर्ट.सरन्यायाधीशपदासाठी पात्र व्यक्तीन्या. शरद बोबडे हे देशाच्या सरन्यायाधीशपदासाठी सर्व दृष्टीने पात्र व्यक्ती आहेत. ते नागपूरचे सुपुत्र आहेत. त्यामुळे नागपूर विधी क्षेत्राला त्यांच्यावर अभिमान आहे. त्यांच्यामुळे नागपूर विधी क्षेत्राची प्रतिष्ठा शिखरावर पोहचली आहे. त्यांना सरन्यायाधीश म्हणून कार्य करण्यासाठी दीर्घ काळ मिळणार आहे. दरम्यान, ते आदर्श निर्माण करतील याची खात्री आहे.अ‍ॅड. आनंद जयस्वाल, वरिष्ठ वकील, हायकोर्ट.हा अभिमानाचा क्षणन्या. शरद बोबडे यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यामुळे खूप अभिमान वाटतो आहे. न्या. बोबडे यांना गेल्या ५० वर्षांपासून ओळखतो. त्यांची गुणवत्ता जवळून पाहिली आहे. ते सरन्यायाधीशपदासाठी सर्व दृष्टीने पात्र व्यक्ती आहेत. त्यांना सामाजिक प्रश्नांची सखोल जाण आहे.अ‍ॅड. सुधीर पुराणिक, ज्येष्ठ वकील, हायकोर्ट.नागपूरसाठी अभिमानाची बाबन्या. शरद बोबडे यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणे ही नागपूर विधी क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या रुपाने सर्व दृष्टीने योग्य व्यक्ती सरन्यायाधीशपदी विराजमान होणार आहे. न्या. मोहम्मद हिदायतुल्ला यांच्यानंतर नागपुरातील कोणती व्यक्ती सरन्यायाधीश होईल याची उत्सुकता अनेक वर्षे होती. न्या. बोबडे यांचा कार्यकाळ सर्वोत्कृष्ट ठरेल.अ‍ॅड. गौरी वेंकटरमन, अध्यक्ष, हायकोर्ट बार असोसिएशन.वकिलांसाठी प्रेरणास्त्रोतन्या. शरद बोबडे हे वकिलांसाठी प्रेरणास्त्रोत झाले आहेत. परिश्रम घेतल्यानंतर न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पदापर्यंत पोहचता येऊ शकते ही प्रेरणा येणाऱ्या काळात वकिलांना मिळत राहील. न्या. बोबडे यांनी नागपूरमध्ये विविध न्यायालयांत वकिली व्यवसाय केला. त्यामुळे त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती होणे ही विधी क्षेत्रासह संपूर्ण नागपूरकरिता गर्वाची बाब आहे.अ‍ॅड. कमल सतुजा, अध्यक्ष, डिस्ट्रिक्ट बार असोसिएशन.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयadvocateवकिल