शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

दिवाळी एक्स्प्रेसला लागले ‘रिग्रेट’चे ग्रहण!

By admin | Updated: August 22, 2016 02:36 IST

दिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. अनेकजण या सणाला आपल्या घराकडे परततात.

आरक्षण फुल्ल : प्रतीक्षा यादी ४०० वर, खिशाला पडणार ताणदयानंद पाईकराव  नागपूरदिवाळी म्हणजे प्रकाशाचा आणि आनंदाचा सण. अनेकजण या सणाला आपल्या घराकडे परततात. यामुळे या दिवसात रेल्वेगाड्या फुल्ल होतात. परंतु दिवाळीला अजून दोन महिने एक आठवड्याचा कालावधी असताना आताच दिवाळीच्या काळातील सर्व रेल्वेगाड्यातील आरक्षण फुल्ल झाले आहे. सर्वच रेल्वेगाड्यांचा ताबा दलालांनी घेतल्यामुळे प्रतीक्षा यादी (वेटिंग) ४०० च्या आसपास पोहोचली आहे. तर काही गाड्यांचे तिकीटच मिळणे बंद झाले (रिग्रेट) आहे. यामुळे आता दिवाळीत प्रवाशांना दुप्पट ते तिप्पट तिकिटाचे शुल्क भरून महागड्या खासगी ट्रॅव्हल्स, विमानाने प्रवास करण्याची पाळी येणार आहे.दिवाळीनिमित्त अनेकजण आपल्या कुटुंबीयांसोबत हा सण साजरा करण्याला प्राधान्य देतात. यामुळे या काळात खासगी ट्रॅव्हल्सचे दर गगनाला भिडल्याची स्थिती असते. एरव्ही ७०० ते ९०० रुपयांना मिळणारे ट्रॅव्हल्सचे तिकीट दिवाळीच्या काळात तीन हजार रुपयांवर पोहोचते. प्रवासाचे सर्वात स्वस्त आणि फायदेशीर माध्यम म्हणून असंख्य प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. प्रवाशांच्या या मानसिकतेचा फायदा घेऊन दिवाळीतील सर्व आरक्षित तिकिटांवर दलालांनी ताबा मिळविल्याची स्थिती आहे. दिवाळीच्या काळात नागपुरातून मुंबई, पुणे, दिल्ली आणि बहुतांश शहरात जाणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्यांचे ‘वेटिंग’ वाढले आहे. दिवाळीला दोन महिने एक आठवडा असताना आताच आरक्षणाची ही स्थिती निर्माण झाल्यामुळे प्रवाशांच्या खिशाला ताण पडणार हे निश्चित झाले आहे. मुंबई, दिल्ली मार्गही ‘फुल्ल’नागपूर : नागपुरातून पुण्याला जाणाऱ्या १२१३६ नागपूर-पुणे एक्स्प्रेसमध्ये ३१ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये ९८, थर्ड एसीत ६७ वेटिंग आहे. २ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये ३२७ तर थर्ड एसीत १७८, ५ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये ३७५, थर्ड एसीत २३१ एवढी प्रतीक्षा यादी आहे. १२१३० बिलासपूर-पुणे आझादहिंद एक्स्प्रेसमध्ये ३१ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये ६१ वेटिंग, थर्ड एसीत ३४, १ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये १४९ आणि थर्ड एसीत ५१, तर २ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये १८६ आणि थर्ड एसीत ५१ वेटिंग आहे. १२११४ नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेसमध्ये १ नोव्हेंबरला तिकीट मिळणेच बंद झाले असून रिग्रेटची स्थिती आहे. ४ नोव्हेंबरला २३४ वेटिंग, ६ नोव्हेंबरला रिग्रेटची स्थिती आहे.मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यात १२१०६ गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेसमध्ये ३१ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये ३८, थर्ड एसीत १८, १ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये ७४, थर्ड एसीत ५७, २ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये ११४, थर्ड एसीत ४९ वेटिंग आहे. दुरांतो एक्स्प्रेसमध्येही ३१ आॅक्टोबरला स्लिपरमध्ये ५९, थर्ड एसीत १८, १ नोव्हेंबरला स्लिपरमध्ये १४६, थर्ड एसीत ६६ वेटिंग आहे. तर २ नोव्हेंबरला ‘रिग्रेट’ची स्थिती आहे. दिल्लीकडे जाणाऱ्या गाड्यात १६०३१ अंदमान एक्स्प्रेसमध्ये ३१ आॅक्टोबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान ६७ वेटिंग आहे. १२७२१ निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये २८ आणि २९ आॅक्टोबरला रिग्रेटची स्थिती आहे. तर १२७२३ तेलंगाना एक्स्प्रेसमध्ये ३१ आॅक्टोबरला सर्वच कोचमध्ये रिग्रेटची स्थिती असून प्रवाशांना तिकीट मिळणेही बंद झाले आहे. याशिवाय इतर महत्त्वाच्या शहरात नागपुरातून जाणाऱ्या गाड्यांची हीच स्थिती असल्याचे आढळले. यामुळे प्रवाशांच्या खिशाला दिवाळीत ताण पडून त्यांना अधिकची रक्कम मोजून प्रवास करण्याची पाळी येणार आहे.(प्रतिनिधी)स्पेशल ट्रेनची घोषणा आताच हवीदिवाळीच्या काळातील सर्व रेल्वेगाड्यात वेटिंग आणि रिग्रेटची स्थिती निर्माण झाली आहे. दलालांनी आताच तिकिटे खरेदी करून ठेवल्यामुळे ही वेळ आली असून यात सर्वसामान्य प्रवाशांना नाहक मनस्ताप होणार आहे. रेल्वे प्रशासन दिवाळीच्या काळात ऐनवेळी स्पेशल ट्रेनची घोषणा करते. या स्पेशल ट्रेनबाबत बहुतांश प्रवाशांना माहितीच होत नसल्यामुळे त्या गाड्या रिकाम्या जातात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी आताच स्पेशल ट्रेनची घोषणा करण्याची गरज आहे.’प्रवीण डबली, माजी सदस्य, प्रादेशिक रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिती