शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचाऱ्यांची दिवाळी जाणार अंधारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 20:26 IST

नवीन शासनादेश निर्गमित केल्यामुळे आता दिवाळीपूर्वी पगार होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पूर्णत: हिरमोड झाला आहे.

ठळक मुद्देदिवाळीपूर्वी वेतन देण्याच्या निर्णयाला स्थगिती : कर्मचाऱ्यांच्या आनंदावर विरजण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दिवाळी सणाचे महत्त्व लक्षात घेता सर्व कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर महिन्याचे वेतन दिवाळीपूर्वी अर्थात २४ तारखेपूर्वी करण्यात यावे याबाबतचा शासनादेश शासनाच्या वित्त विभागाने ९ ऑक्टोबरला निर्गमित करण्यात आला होता. परंतु अवघे दोन दिवस उलटत नाहीत तोच वित्त विभागाने या आदेशाला स्थगिती देण्याबाबतचा नवीन शासनादेश निर्गमित केल्यामुळे आता दिवाळीपूर्वी पगार होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पूर्णत: हिरमोड झाला आहे.साधारणत: ज्या वर्षी महिन्यातील २० तारखेनंतर दिवाळी असते त्यावर्षी दिवाळीच्या महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी देण्यात यावा, असे शासन परिपत्रक शासनाकडून निर्गमित करून कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी पगार दिला जातो. वर्षानुवर्षे हा पायंडा सुरू आहे. त्याप्रमाणे यावर्षीसुद्घा सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी करण्यात यावे असा शासनादेश राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून ९ ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आला होता. परंतु लेखा व कोषागार संचालनालयाच्या तांत्रिक अडचणीचे कारण देत अवघ्या दोनच दिवसात वित्त विभागाकडून त्यांच्या स्वत:च्याच आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांचे ऑक्टोबरचे वेतन दिवाळीपूर्वी होणार नाही.कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वी करण्याच्या आदेशावरील स्थगिती उठवून वेतन दिवाळीपूर्वी करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष लीलाधर ठाकरे सरचिटणीस अनिल नासरे यांचेसह धर्मेंद्र गिरडकर, दिगंबर शंभरकर, दिनकर वानोडे, राजेंद्र कुकडे, अनिल श्रीगिरीवार, राजू बोकडे, किशोर मेश्राम, विजय बरडे, श्रीकृष्ण भोयर, राजेश मथुरे, पांडुरंग मानकर, नीलेश वाघ, दिलीप म्हसेकर, नरेंद्र वरघने, टिकेश कालेश्वर, सुधीर कांबळे आदींनी शासनाकडे केली आहे.दोन शासकीय यंत्रणेत समन्वयाचा अभावराज्य शासनाने माहे ऑक्टोबरचा पगार दिवाळीपूर्वी २४ ऑक्टोबरपर्यंत करण्याचे आदेश जारी केले होते, मात्र विधानसभा निवडणुकीचे कारण देत लेखा व कोषागार संचालकांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला, दोन शासकीय यंत्रणेतच समन्वयाचा आभाव दिसून येतो. पगाराच्या बाबतीत एकदा दिलेला आदेश पहिल्यांदाच मागे घेण्याची नामुष्की शासनावार आली आहे.-डॉ. सोहन चवरे, जिल्हाध्यक्ष, कास्ट्राईब जि. प. कर्मचारी संघटना

टॅग्स :Employeeकर्मचारीDiwaliदिवाळी