शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात घटस्फोटित महिलेसोबत शरीरसंबंध जोडून लग्नास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 01:01 IST

फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर नंदनवनमधील एका घटस्फोटित महिलेशी (वय २४) प्रेमसंबंध निर्माण करणाऱ्या एका आरोपीने तिच्याशी सहा महिने शरीरसंबंध जोडले. प्रारंभी लग्नाचे वचन देणाऱ्या  आरोपीने नंतर मात्र लग्नास नकार दिला.

ठळक मुद्देघरजावई बनून राहिला : पीडितासह आईवडिलांनाही मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फेसबुकवरून मैत्री झाल्यानंतर नंदनवनमधील एका घटस्फोटित महिलेशी (वय २४) प्रेमसंबंध निर्माण करणाऱ्या एका आरोपीने तिच्याशी सहा महिने शरीरसंबंध जोडले. प्रारंभी लग्नाचे वचन देणाऱ्या  आरोपीने नंतर मात्र लग्नास नकार दिला. तिने लग्नासाठी दबाव टाकताच आरोपीने तिलाच नव्हे तर तिच्या आईवडिलांनाही बेदम मारहाण केली. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी गुरुवारी गणेश रामभाऊ राजपूत (वय ३२, रा. आशीर्वादनगर, सक्करदरा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.आरोपी राजपूत आणि तक्रार करणाऱ्या  महिलेची सप्टेंबर २०१७ मध्ये फेसबुकवरून मैत्री झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध फुलले. तो तिच्या घरी जाऊ लागला. हिच्यासोबत मला लग्न करायचे आहे. म्हणाल तर मी घरजावई बनून राहतो आणि हिलाच नव्हे तर तुम्हालाही आईवडिलांसारखे सांभाळतो, अशी मखलाशी त्यावेळी आरोपी राजपूतने केली होती. त्यामुळे महिलेच्या आईवडिलांचाही त्याच्यावर विश्वास बसला. परिणामी तो कोणत्याही वेळी तिच्या घरी येत जात होता. २९ सप्टेंबर २०१७ ला सकाळी ९ च्या सुमारास ती एकटीच घरी असताना आरोपी तेथे आला. त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर मनात येईल तेव्हा तो तिच्या घरी जात होता आणि तिला शरीरसंबंधाची मागणी करीत होता. तिने नकार दिल्यास तो दिला धाकही दाखवायचा. तो लग्न करणार असल्यामुळे महिलाही फारसा विरोध करीत नव्हती. दरम्यान, तब्बल सहा महिन्यांपासून वेळोवेळी शरीरसंबंध जोडणारा राजपूत दोन महिन्यांपूर्वी तिच्या घरी आला आणि तेव्हापासून तिच्या घरीच राहू लागला.लग्न न करताच तो घरजावयासारखा राहत असल्याने आजूबाजूला कुजबुज सुरू झाली. ती कानावर आल्याने महिलेने त्याला लग्नाची गळ घातली. तो टाळाटाळ करू लागला.अन् त्याचे बिंग फुटले७ एप्रिलला सायंकाळी महिला आणि आरोपी राजपूत बाहेर फिरायला गेले. यावेळी तो विवाहित असल्याचे तिला कळले. तिला जबर मानसिक धक्का बसला. त्याचे बिंग फुटल्यामुळे त्यांच्यात त्यावेळी वाद झाला. दरम्यान, तिने त्याला लगेच लग्न करण्याचा हट्ट धरला. त्याने नकार दिल्याने तिने आपल्या आईवडिलांना ही बाब सांगितली.बुधवारी ११ एप्रिलला सकाळी ८ वाजता या विषयावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. ते पाहून तरुणीच्या आईवडिलांनी ‘तू आधी लग्नास तयार होता, आता का नकार देतो’, अशी विचारणा केली. यावर आरोपीने त्यांच्यासोबतही वाद घालून शिवीगाळ केली. वाद टोकाला गेल्यानंतर आरोपी राजपूतने महिला तसेच तिच्या आईवडिलांना बेदम मारहाण केली. आरोपी राजपूतचा खरा चेहरा समोर आल्याने व्यथित झालेल्या महिलेने गुरुवारी नंदनवन ठाण्यात तक्रार नोंदवली. उपनिरीक्षक एच. एस. थोरात यांनी बलात्कार करून मारहाण करणे, धमकी देण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्याला गुरुवारी रात्री अटक करण्यात आली.

 

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर