शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

नागपुरातील बुलक कार्ट बारवर विभागीय गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 21:24 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदरच्या माऊंंट रोडवरील बुलक कार्ट बारवर कठोर कारवाईचे संकेत देत विभागीय गुन्हा दाखल केला आहे. होम डिलिव्हरीच्या नावाने वेळमर्यादेनंतर बारमधून मद्यविक्री करण्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

ठळक मुद्देउत्पादन शुल्क विभागाची कारवाई : भोजन पार्सलच्या नावाने मद्यविक्री

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सदरच्या माऊंंट रोडवरील बुलक कार्ट बारवर कठोर कारवाईचे संकेत देत विभागीय गुन्हा दाखल केला आहे. होम डिलिव्हरीच्या नावाने वेळमर्यादेनंतर बारमधून मद्यविक्री करण्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.बीअरबारमधून भोजनाचे पार्सल देण्याच्या नावाखाली या बारमधून रात्री उशिरापर्यंत मद्यविक्री करण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानंतर युनिट-३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी शुक्रवारी रात्री ८.३० वाजतादरम्यान बारवर धाड घालून ही बदमाशी उघडकीस आणली. विशेष म्हणजे कोविड-१९ संक्रमणाचा धोका लक्षात घेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शहरातील बारमधून सायंकाळी ७ वाजतापर्यंत मद्याच्या ऑनलाईन डिलिव्हरीला परवानगी देण्यात आली आहे. असे असताना रात्री ८.३० वाजता बारचा नोकर कमलेश तिवारी याने मद्याची बॉटल आणून देताच त्याला ताब्यात घेऊन पोलीस दलाने आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश करताच बार संचालक मोहिंदर बलविंदर सिंह (४४, फ्रेंड्स कॉलनी), कवलजित सोहन सिंह (३४), गुरप्रीत सोहन सिंह, (२८, अमर सज्जन कॉम्प्लेक्स, सदर) हे तिघेही काऊंटरवर बसले होते. पोलिसांनी बारच्या कॅश काऊंटरमध्ये पंटरजवळ पाठविलेल्या ५०० रुपयांच्या तीन नोटा जप्त करून बार चालकांनाही ताब्यात घेतले.यानंतर एक्साईज विभागाच्या टीमने बारच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार तपासत आरोपपत्र तयार केले. बारमध्येच आरोपींना आरोपपत्र सुपूर्द करून विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांना रिपोर्ट सादर करण्यात आला. या रिपोर्टवरूनच बार संचालकांना उत्तरासाठी हजर होण्याचा आदेश दिला जाणार आहे. त्यांच्या खुलाशानंतर रिपोर्ट जिल्हाधिकाऱ्यांना सोपविण्यात येईल.जिल्हाधिकारी घेणार कारवाईचा निर्णयबार संचालकांचे जबाब नोंदविल्यानंतर एक्साईज अधीक्षक सोनोने हे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना रिपोर्ट सादर करतील. यानंतर जिल्हाधिकारी प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत बारचा परवाना रद्द करण्यासह इतर प्रकारच्या कारवाईचे आदेश जारी करतील, अशी शक्यता आहे.

टॅग्स :liquor banदारूबंदीExcise Departmentउत्पादन शुल्क विभाग