शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचणीसाठी नागपुरात एम्स व मेयोला वाटून दिले विदर्भातील जिल्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 13:06 IST

एकाच प्रयोगशाळेवर चाचण्यांचा भार पडू नये म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाने मेयोच्या प्रयोगशाळेकडे विदर्भातील पाच तर ‘एम्स’च्या प्रयोगशाळेकडे सहा जिल्ह्यांचा भार सोपविला आहे.

ठळक मुद्देएम्सकडे अकोला, अमरावती, बुलडाणा व वाशिम जिल्हातर मेयोकडे नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा व भंडारा जिल्हा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल) कोरोनाची चाचणी सुरू असताना तीन दिवसांपूर्वी येथील यंत्र बंद पडले. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी रातोरात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेला (एम्स) कोरोना तपासणीची मान्यता मिळवून दिली. यामुळे नागपुरात आता दोन प्रयोगशाळा झाल्या आहेत. एकाच प्रयोगशाळेवर चाचण्यांचा भार पडू नये म्हणून वैद्यकीय शिक्षण विभागाने मेयोच्या प्रयोगशाळेकडे विदर्भातील पाच तर ‘एम्स’च्या प्रयोगशाळेकडे सहा जिल्ह्यांचा भार सोपविला आहे.‘कोविड-१९’ आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यामध्ये विविध शासकीय, महानगरपालिका व केंद्र शासनाच्या संस्थांमधील १३ प्रयोगशाळांना ‘आयसीएमआर’ने परवानगी दिली आहे. यात कस्तुरबा रुग्णलय मुंबई, के.ई.एम. रुग्णालय परळ मुंबई, ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर.ज. जी. समूह रुग्णालय भायखळा मुंबई, हाफकिन प्रशिक्षण संशोधन व चाचणी संस्था परळ मुंबई, बे.जी.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वाेपचार रुग्णालय पुणे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी पुणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मीरज जि. सांगली, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धुळे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, ‘एम्स’ नागपूर व मेयो नागपूरचा समावेश आहे. मेयोकडे नागपूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा व भंडारा जिल्ह्याची जबाबदारी आहे. तर ‘एम्स’कडे अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी आहे. ५ एप्रिलपासून रुग्णसेवेत सुरू झालेल्या ‘एम्स’च्या प्रयोगशाळेत आतापर्यंत १८६ नमुने तपासण्यात आले. यातील दोन नमुने पॉझिटिव्ह तर १७७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर मेयोने आतापर्यंत ९६१ नमुने तपासले असून १७ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. या प्रयोगशाळेत मध्यप्रदेश व छत्तीसगड येथूनही नमुने येतात. शनिवारपासून बंद पडलेले येथील यंत्र सोमवारपासून सुरू झाले आहे. यामुळे या दोन्ही प्रयोगशाळेतून रोज दोनशेवर नमुने तपासण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस