नागपूर : रा. पै. समर्थ स्मारक समितीच्या वतीने विदर्भरत्न व नागपूररत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आले. समारंभाला अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त सहा. पोलीस आयुक्त धनराज वंजारी, डॉ. दळवी स्मारक रुग्णालयाचे संचालक नाना आखरे उपस्थित होते. विदर्भरत्न पुरस्काराने वरोरा येथील ज्येष्ठ व्यंग चित्रकार जयवंत काकडे, अमरावती येथील चित्रपट कलावंत श्रेयस जाधव, गडचिरोली येथील महिला उद्योजिका प्राजक्ता आदमने कारू यांना पुरस्कृत करण्यात आले. नागपूररत्न पुरस्कारने वन्यजीवप्रेमी हिमांशु बागडे यांना पुरस्कृत करण्यात आले. जुई अग्रवाल या विद्यार्थिनीलाही गौरविण्यात आले. संचालन रश्मी पदवाड मदनकर व पुरुषोत्तम घाटोळे यांनी केले. प्रास्ताविक स्वप्निल मदन समर्थ यांनी केले. आभार अनिल मालोकर यांनी मानले. कार्यक्रमाला कोमल ठाकरे, प्राचार्य किरण उराडे, आशा समर्थ, सुमन पाटणे, मृणाली दंदे, ममता समर्थ, विकी वैतागे, प्रदीप खानोरकर, डॉ. पवन दंदे, प्रदीप पलांदूरकर, राजेंद्र वारजूरकर, सिया समर्थ यांचे सहकार्य लाभले.
विदर्भरत्न व नागपूररत्न पुरस्काराचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:50 IST