नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात फिट इंडिया फ्रीडम रन अभियानांतर्गत डिव्हिजनल स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने पुरस्कार वितरण करण्यात आले. ‘डीआरएम’ कार्यालयात झालेल्या या समारंभात विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिचा खरे यांनी नव्या वर्षात स्वस्थ राहून दुसऱ्यांनाही स्वस्थ राहण्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प घेण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी अभियानांतर्गत नियमितरीत्या सायकलिंग, रनिंग, वॉकिंग आणि योगा करणाऱ्या रेल्वे अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले. यात वरिष्ठ विभागीय रेल्वे अभियंता (समन्वय) पवन पाटील, सहायक विभागीय यांत्रिक अभियंता आर. एल. प्यासे, मुख्य तिकीट निरीक्षक अमरेश कुमार, लिपिक अंशु नागेश बनसोड, लोको पायलट जी. डी. कुमरे आणि कनिष्ठ अभियंता प्रियंका मुकुंदे यांचा समावेश आहे. कार्यक्रमाला अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (परिचालन) अनुप कुमार सत्पथी, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (तांत्रिक) मनोज तिवारी, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (प्रशासन) जय सिंह, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि विभागीय क्रीडा अधिकारी कृष्णाथ पाटील, मुख्य कार्यालय अधीक्षक सुनील कापटे उपस्थित होते.
...............