शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

भाविकांना ताजा प्रसाद वाटप करा; गणेश मंडळांना एफडीएच्या सूचना

By मोरेश्वर मानापुरे | Updated: September 16, 2023 18:23 IST

गणेश मंडळांनी काय करावे?

नागपूर: गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि वितरित करताना स्वच्छेतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे करावे. प्रसाद तयार करून वितरित करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाकडे नोंदणी कराव्यात, अशा सूचना अन्न व औषध प्रशासनाने मंडळांना दिल्या आहेत.गणेश मंडळांनी काय करावे?

- आवश्यक तेवढाच ताजा प्रसाद भाविकांना वाटप करावा, शिळ्या अन्नपदार्थांचे वाटप करू नये.- प्रसाद काचेच्या झाकणात किंवा पारदर्शक प्लास्टिकच्या आवरणात झाकून ठेवावा.- प्रसाद हाताळण्यांचे कपडे स्वच्छ असावेत. साबणाने हात स्वच्छ धुवूनच कामाला सुरूवात करावी.- संसर्गजन्य आजार झालेल्यांनी प्रसाद तयार करू नये.- प्रसाद तयार करणाऱ्यांनी आणि वाटप करणाऱ्यांनी नाक, कान, डोके, केस खाजवणे, डोळे चोळणे, शिंकणे, थुंकणे, नाक शिंकरणे टाळावे.- वाटप करणाऱ्यांनी हात पुसण्यासाठी स्वच्छ कापडे वापरावे.- प्रसाद तयार करणाऱ्यांनी हातमोजे आणि अ‍ॅप्रन घालावे, केस संपूर्णपणे झाकण्यासाठी टोपी वापरावी. तोंडाला मास्क लावावा.- प्रसाद तयार करण्यासाठी, भांडी धुण्यासाठी वापरण्यात येणारे पाणी पिण्यायोग्य असावे.- पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात साठवावे, त्यावर स्वच्छ झाकण असावे.- निर्जंतुकीकरण करूनच पाणी पिण्यास द्यावे. भांड्यांचा वापर करण्यापूर्वी ती धुण्याच्या साबणाने, द्रावणाने स्वच्छ घासावीत.- भांडी कोरडी करण्यासाठी स्वच्छ कपड्याचा वापर करावा, तसेच भांडी स्वच्छ, कोरड्या जागेत ठेवावीत.

प्रसाद तयार करून भाविकांना वितरित करणाऱ्या गणेश मंडळांनी https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर १०० रुपये शुल्क भरून नोंदणी करावी. मंडळांनी कच्च्या मालाची खरेदी परवानाधारक दुकानातूनच करावी आणि खरेदीचे बिल घ्यावे.अभय देशपांडे, सहआयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव