शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

असंतोषामुळे बसपामध्ये वेगवेगळ्या चुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 00:14 IST

विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या असंतोषामुळे बहुजन समाज पार्टीत दोन गट पडले असून त्यांनी वेगवेगळ्या चुली मांडल्या आहेत. ते आपापली ताकद वाढविण्याचे प्रयत्न करीत आहेत.

ठळक मुद्देदोन गट पडले : आपापली ताकद वाढविण्याचे प्रयत्न

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : विधानसभा निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या असंतोषामुळे बहुजन समाज पार्टीत दोन गट पडले असून त्यांनी वेगवेगळ्या चुली मांडल्या आहेत. ते आपापली ताकद वाढविण्याचे प्रयत्न करीत आहेत.प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांना विधानसभा निवडणुकीनंतर तत्काळ बडतर्फ करण्यात आल्यामुळे बसपातील असंतोष चव्हाट्यावर आला होता. साखरे यांच्यावर पक्षविरोधी कार्य करण्याचा आरोप लावण्यात आला होता. राज्य प्रभारी डॉ. अशोक सिद्धार्थ यांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर प्रदेश, जिल्हा व तालुका कार्यकारिणी बर्खास्त करण्यात आली. त्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले. नवीन प्रदेशाध्यक्षाच्या घोषणेने त्यात आणखी तेल ओतले. त्यामुळे एका पदाधिकाऱ्याच्या समर्थकांनी राष्ट्रीय महासचिव वीरसिंह व नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. संदीप ताजणे यांच्यावर पक्षाला विकण्याचा आरोप केला व त्या दोघांचे पुतळे जाळले. प्रत्युत्तरात या नेत्यांच्या समर्थकांनी आंदोलकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्या वादातून पक्षात दोन गट पडले. परिणामी, वरिष्ठस्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांनी पक्षांतर्गतचा असंतोष शांत होण्याची प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी नाराज कार्यकर्त्यांनी माजी प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांच्यावर हल्ला केला होता. तसेच, जूनमध्ये अ‍ॅड. ताजने यांना मारहाण केली होती. सध्याची स्थिती पाहता समर्थकांना मुंबईत बोलावून त्यांचा नवीन कार्यकारिणीत समावेश केला जात आहे. दुसरीकडे नागपुरातील काही मोठे पदाधिकारी स्वत:ची ताकद कायम ठेवण्यासाठी प्रयत्नरत आहेत. येणाºया दिवसांत जिल्ह्यातील पर्यटनस्थळी बैठका आयोजित केल्या जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मारहाणीची छायाचित्रे व्हायरलअ‍ॅड. ताजने यांना अमरावती येथे मारहाण करताना काढण्यात आलेली छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहेत. बसपातून दुसऱ्या पक्षात गेलेले नेते त्यावर बोचणारे मतप्रदर्शन करीत आहेत. कार्यकर्त्यांचा मार बसलेल्या व्यक्तीलाच प्रदेशाध्यक्ष करण्याची प्रथा बसपामध्ये निर्माण झाली आहे अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

टॅग्स :Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीnagpurनागपूरPoliticsराजकारण