शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये असंतुष्टांचा भडका

By admin | Updated: February 5, 2017 02:18 IST

ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेतील बंडखोरांना उमेदवारी जाहीर करणाऱ्या आपल्या नेत्यांविरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून आला.

नारेबाजी व निदर्शने : काहींनी सोडला पक्ष नागपूर : ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेनेतील बंडखोरांना उमेदवारी जाहीर करणाऱ्या आपल्या नेत्यांविरुद्ध काँग्रेस कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून आला. नेत्यांविरुद्ध ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. काहींनी पक्षातील आपल्या पदाचे राजीनामे देत असल्याचे जाहीर केले.(प्रतिनिधी) मोमीनपुरात निदर्शने, पुतळा दहन काँग्रेस कार्यकर्ते पदधिकाऱ्यांनी मोमीनपुरा चौकात शनिवारी रात्री १० वाजता निदर्शने केली. या कार्यकर्त्यांनी शहर काँग्रेस कमिटी आणि मध्य नागपूरचे आमदार राहिलेले अनिस अहमद यांच्या विरुद्ध नारेबाजी करीत आपला निषेध व्यक्त केला. निदर्शनादरम्यान पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी तिकीट वाटप करताना हलबा व तेली समाजाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला. सामान्य वर्ग व ओबीसी समाजाला देण्यात आलेल्या जागांबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. निदर्शनात शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशरफ खान, माजी उपमहापौर अब्दुल लतीफ, इरफान कपूर, माजी नगरसेवक शमीम अख्तर भादा, ललिता धापोडकर, रम्मू अन्सारी, माजी नगरसेवक अशरफु न्निसा इफ्तेखार अन्सारी, मुख्तार अन्सारी, शकील अहमद पप्पूभाई आदींचा समावेश होता. हिवरी नगरात नारेबाजी पूर्व नागपुरातील प्रभाग क्रमांक २६ व २३ मधील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या विरुद्ध भीम चौक हिवरीनगर येथे निदर्शने केली. तिकीट वाटपात भेदभाव झाल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप होता. हरीश रामटेके, शुभम मोटघरे, रवि बोरकर आणि विनोद मंडपे यांनी निदर्शनाचे नेतृत्व केले. प्रभाग २६ मधून दुसऱ्या पक्षातून आलेल्या बंडखोरांना तिकीट देण्यात आल्याचा त्यांचा आरोप होता. निदर्शकांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, शहराध्यक्ष विकास ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अ‍ॅड. अभिजित वंजारी यांच्या विरोधात नारेबाजी केली. संगीता वालदे, संघपाल मेश्राम, गोपाल शेंडे, कमल जोशी, रमेश अंबर्ते, सलीम खान आदींचा यात समावेश होता.