शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील सरकारी वकील नियुक्तीच्या जाहिरातीने असंतोष

By admin | Updated: March 19, 2015 02:33 IST

राज्यभरातील सरकारी वकील बदलण्याच्या हेतूने राज्य सरकारने नव्याने सरकारी वकिलांच्या नियुक्त्या करण्यासाठी जाहिराती काढल्याने सरकारी वकिलांमध्ये असंतोष निर्माण झाला असून ...

नागपूर : राज्यभरातील सरकारी वकील बदलण्याच्या हेतूने राज्य सरकारने नव्याने सरकारी वकिलांच्या नियुक्त्या करण्यासाठी जाहिराती काढल्याने सरकारी वकिलांमध्ये असंतोष निर्माण झाला असून न्यायालयातील कामकाजावर परिणाम झाल्याचे दिसत आहे. सध्या जिल्हा न्यायालयात ३० सरकारी वकील कार्यरत आहेत. प्रमुख जिल्हा सरकारी वकिलाची तीन वर्षे तर सहायक सरकारी वकिलांची दोन वर्षांसाठी नियुक्ती झालेली आहे. एकदा विशिष्ट कालावधीसाठी नियुक्ती झाल्यास राज्य सरकार नव्याने नियुक्तीसाठी दुसरी जाहिरात काढू शकत नाही आणि नियुक्त झालेल्या सरकारी वकिलांना बदलवूही शकत नाही, असे निवाडे नीलिमा वर्तक विरुद्ध महाराष्ट्र राज्य, मुद्रिकाप्रसाद विरुद्ध बिहार राज्य, चित्रलेखा विद्यार्थीविरुद्ध उत्तर प्रदेश या प्रकरणांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत. उत्तर प्रदेशात मायावती सरकार सत्तारूढ झाले तेव्हा सर्व सरकारी वकिलांना काढण्यात आले होते. याविरुद्ध या सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर उच्च न्यायालयाने स्थगनादेश दिला होता आणि हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने कायम केला होता. नियुक्तीची मुदत संपत नाही तोपर्यंत संबंधित सरकारी वकिलांना हटविता येत नाही, असा निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. राज्यात भाजपचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर पहिल्यांदाच संपूर्ण सरकारी वकिलांना बदलविण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्या. भूषण गवई आणि न्या. व्ही. एम. देशपांडे यांनी ११ सप्टेंबर २०१४ रोजी गोविंदराव वानरे विरुद्ध राज्य सरकार या प्रकरणात सरकारी वकिलांच्या नियुक्तीसाठी नव्याने नियमावली तयार करण्याचे आणि यासाठी न्याय व विधी विभागाचे प्रधान सचिव आणि राज्याच्या महाधिवक्त्यांच्या प्रतिनिधीचा समावेश असलेले पॅनल तयार करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. हे निर्देश देण्यापूर्वी याच प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान एक सरकारी वकील सरकारची बाजू मांडू शकला नव्हता. यापूर्वीही असे प्रकार दोन-तीन वेळा घडल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. सरकारी वकिलाच्या नियुक्त्या गुणवत्तेवर न होता राजकीय प्रभावातून होतात. त्यांची मौखिक कसोटी होत नसल्याने त्यांची बुद्धिमत्ता तपासली जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाच्या लक्षात आले होते. उच्च न्यायालयाच्या या निर्देशांचे पालन म्हणून राज्यभरातीलच सरकारी वकील बदलविले जात असल्याचे बोलले जात आहे. उच्च न्यायालयाने केवळ नव्याने नियमावली तयार करण्याचे निर्देश दिले होते.नागपूर जिल्ह्यात सध्या कार्यरत सरकारी वकिलांच्या मौखिक मुलाखती २०११ मध्ये त्यावेळचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. शुक्रे यांच्या अध्यक्षस्थानी गठित तीन न्यायाधीशांच्या समितीने घेतल्या होत्या. त्यावेळी जाहिरात काढण्यात आली होती. या समितीने निवड झालेल्या वकिलांची नावे सरकारकडे पाठविली होती. त्यानंतरच या नियुक्त्या झाल्या होत्या. (प्रतिनिधी)