शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर आरटीओतील कर्मचाऱ्यावर अपसंपदेचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 22:28 IST

प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) नागपूर येथील प्रणाली प्रशासक (संगणक) पदावर कार्यरत असलेल्या प्रदीप वासुदेवराव लेहगावकर याच्याविरुद्ध भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमविल्याबाबत अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगैरमार्गाने जमविली अपसंपदालाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) नागपूर येथील प्रणाली प्रशासक (संगणक) पदावर कार्यरत असलेल्या प्रदीप वासुदेवराव लेहगावकर याच्याविरुद्ध भ्रष्ट मार्गाने संपत्ती जमविल्याबाबत अपसंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी प्रदीप लेहगावकर हा आरटीओ कार्यालय येथे प्रणाली प्रशासक (संगणक) या पदावर कार्यरत आहे. त्याने लोकसेवक पदाचा गैरवापर करून अपसंपदा जमविल्याच्या अनेक तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागला प्राप्त झाल्या होत्या. वाढत्या तक्रारी लक्षात घेता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आपल्या स्तरावर गुप्त चौकशी सुरू केली. या चौकशीत लेहगावकर हा २१ मे १९९२ रोजी नोकरीवर लागल्यापासून ते ९ आॅगस्ट २०१२ या कालावधीत त्याने मिळविलेल्या एकूण संपत्तीपैकी १८.१७ टक्के संपत्ती जास्त कमावल्याचे आढळून आले. चार लाख ७० हजार ८७४ रुपये (१८.१७ टक्के) इतक्या किमतीच्या संपत्तीचा हिशेब तो देऊ शकला नाही. त्यामुळे ही संपत्ती त्याने भ्रष्ट मार्गाने कमावल्याचे आढळून आले. त्यानुसार बुधवारी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या घराची झडती घेण्यात आली.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश कदम, शुभांगी देशमुख, पोलीस हवालदार सुनील कळंबे, दिनेश शिवले, पोलीस शिपाई मंगेश कळंबे, दीप्ती मोटघरे, मंजुषा बुंदाले, चालक शिशुपाल वानखेडे यांनी केली.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसCorruptionभ्रष्टाचार