शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
8
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
9
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
10
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
11
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
12
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
13
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
14
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
15
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
17
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
18
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
19
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
20
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड

औषधांपासून मनोरुग्ण वंचित

By admin | Updated: February 7, 2017 01:48 IST

दररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. मनोरुग्णांवर तातडीने योग्य औषधोपचार केल्यास त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते.

प्रादेशिक मनोरुग्णालय : ५० टक्के औषधांचा तुटवडा, कसे होतील रुग्ण बरे?सुमेध वाघमारे नागपूरदररोजच्या ताणतणावांमुळे मनोरुग्णांची संख्या वाढत आहे. मनोरुग्णांवर तातडीने योग्य औषधोपचार केल्यास त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. मात्र, सरकारी अनास्थेमुळे प्रादेशिक मनोरुग्णालयाची अवस्था बिकट झाली आहे. बाह्यरुग्ण विभागात साधारण ५० टक्के औषधांचा तुटवडा पडला आहे. यातच रुग्णालयात नसलेली औषधे लिहून देणे हे नियमबाह्य ठरत असल्याने रुग्ण औषधांपासून वंचित राहत आहे. परिणामी, आजार कमी होण्यापेक्षा तो बळावत असल्याची धक्कादायक माहिती आहे.प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी यणोऱ्या मनोरुग्णांची संख्या मोठी आहे. रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात रोज २५० वर रुग्ण येतात. यातील बहुसंख्य रुग्णांवर महिनोंमहिने उपचार करावे लागतात. गरीब मनोरुग्णांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेणे परवडत नसल्याने त्यांच्यासाठी हे रुग्णालय आशेचा किरण आहे. परंतु लालफितीचा मनमानी कारभार, अपुरा निधी, डॉक्टरांची कमतरता, पर्यायी उपचारांची वानवा अशा त्रुटींमुळे रुग्णसेवा प्रभावित झाली आहे. यातच गेल्या महिन्यांपासून आवश्यक व तातडीने लागणारी औषधेही नसल्याने मनोरुग्णांचे हाल होत आहे. सूत्रानुसार, ‘अ‍ॅण्टी सायोकोटीक’ सारखेच मिरगीवरील ‘अ‍ॅण्टी इपिलेप्टिक’ औषधांचे सात ते आठ प्रकार आहेत. परंतु यातील केवळ दोन प्रकार उपलब्ध आहेत. तणावावर उपयुक्त असलेले ‘एन्टी डिप्रेशन’ औषधांचे केवळ दोन प्रकार शिल्लक आहेत.रुग्णालयात अनेक रुग्ण आक्रमक स्वरूपात येतात. परंतु त्यांना शांत करणारे ‘ओलॅन्झापीन’ व ‘हॅलो पेरिडॉल’ हे औषधच नाही. याला पर्याय असलेले औषध रुग्णाला दिले जाते. परंतु त्याचा फारसा प्रभाव पडत नसल्याचे खुद्द रुग्णांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.मिरगीच्या औषधांचाही अभावमिरगीच्या रुग्णांना दिले जाणारे ‘इपिटॉईन’ औषधांचाही अभाव आहे. ‘पॅसीटेन’, ‘लोराझीपॉम’ याही महत्त्वाच्या औषधी रुग्णालयात नाहीत. यामुळे डॉक्टरांना उपचार करण्यासाठी अनेक अडचणी जात आहेत. येथील डॉक्टरांना रुग्णालयात नसलेली औषधे बाहेरून विकत घेण्यासाठी लिहूनही देता येत नाही. असे केल्यास रुग्ण ‘१०४’ क्रमांकावर तक्रारी करू शकतात. यामुळे डॉक्टर आवश्यक औषधे लिहून न देता पर्यायी औषधे देऊन वेळ भागवून नेत असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)स्थानिक पातळीवर औषधांची खरेदी रुग्णालयात औषधेच नाही असे नाही. जी औषधे नाहीत त्याच्या पर्यायी औषधे दिली जात आहेत. रुग्णालयात जी औषधे नाहीत त्याची माहिती मिळताच सोमवारी पाच हजार रुपयांची औषधे खरेदी करण्यात आली आहेत. या शिवाय औषधांसाठी मोठा निधी लवकरच रुग्णालयाला उपलब्ध होणार आहे. -डॉ. आर.एस. फारुखी, वैद्यकीय अधीक्षक, प्रादेशिक मनोरुग्णालय