शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन रोड काँग्रेसच्या टेंडरविरुद्धची याचिका खारीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 22:01 IST

भव्य स्वरूपामुळे चर्चेत असलेल्या इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या वार्षिक अधिवेशनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनासाठी आवश्यक व्यवस्था करून देण्याकरिता जारी टेंडरला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी खारीज केली. वुई दि वर्किंग एलिमेंट या प्रतिस्पर्धी कंपनीने ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाला या याचिकेमध्ये गुणवत्ता आढळून आली नाही.

ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : विभागीय क्रीडा संकुलात होणार अधिवेशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भव्य स्वरूपामुळे चर्चेत असलेल्या इंडियन रोड काँग्रेसच्या ७९ व्या वार्षिक अधिवेशनामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनासाठी आवश्यक व्यवस्था करून देण्याकरिता जारी टेंडरला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी खारीज केली. वुई दि वर्किंग एलिमेंट या प्रतिस्पर्धी कंपनीने ही याचिका दाखल केली होती. न्यायालयाला या याचिकेमध्ये गुणवत्ता आढळून आली नाही.न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला. मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलामध्ये आयोजित या अधिवेशनाला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. याचिकाकर्त्याने आक्षेप घेतलेले कंत्राट अ‍ॅडमार्क कंपनीला देण्यात आले आहे. कंत्राटाच्या तांत्रिक मूल्यांकनावर व आर्थिक बोलीवर विविध आक्षेप नोंदविल्यानंतरही आवश्यक न्याय मिळाला नसल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. गत १ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस बजावून १९ नोव्हेंबरपर्यंत कुणालाही कंत्राटाचा कार्यादेश जारी करण्यात येऊ नये असा अंतरिम आदेश दिला होता. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाने २९ आॅक्टोबर रोजीच अ‍ॅडमार्क कंपनीला कार्यादेश जारी केला होता. असे असले तरी न्यायालयाच्या अंतरिम आदेशामुळे सांस्कृतिक कार्यक्रमाची व्यवस्था खोळंबली होती. ही बाब लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम विभाग व अ‍ॅडमार्क कंपनीने १९ नोव्हेंबरची प्रतीक्षा न करता १६ नोव्हेंबर रोजी प्रकरण न्यायालयासमक्ष लावून घेतले होते व अंतरिम आदेशामध्ये बदल करण्याची विनंती केली होती.न्यायालयाने ही सुधारित परिस्थिती लक्षात घेता अंतरिम आदेशात बदल करून अ‍ॅडमार्क कंपनीला पुढील आदेशाधीन राहून कार्यादेशाप्रमाणे काम करण्याची मुभा दिली होती. तसेच, पुढील तारखेपर्यंत अ‍ॅडमार्क कंपनीला त्यांनी केलेल्या कामाचे बिल अदा करण्यात येऊ नये असे निर्देश दिले होते. त्यानंतर आज या प्रकरणावर अंतिम सुनावणी पूर्ण झाली. न्यायालयाने ही याचिका खारीज करून अ‍ॅडमार्क कंपनीला टेंडर देण्याचा निर्णय योग्य ठरवला. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता सुबोध धर्माधिकारी, अ‍ॅड. देवेंद्र चव्हाण व अ‍ॅड. निखिल कीर्तने, सरकारतर्फे अ‍ॅड. अविनाश घरोटे तर, अ‍ॅडमार्कतर्फे वरिष्ठ अधिवक्ता आनंद जयस्वाल व अ‍ॅड. नचिकेत मोहरीर यांनी कामकाज पाहिले.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे