शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
6
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
7
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

नागपुरात केबलमुळे होणारे विद्रुपीकरण थांबणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 08:10 IST

नागपुरात शहरातील केबल एजन्सी व इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना लीजवर दिल्या जाईल. भूमिगत केबल नेटवर्कमुळे ओव्हरहेड केबलचे जाळे हळूहळू कमी होऊन शहराचे विद्रूपीकरण थांबणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहरात स्मार्ट सिटी मिशनचे सेफ अ‍ॅन्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कोट्यवधीचा खर्च करून ऑप्टिकल केबलचे जाळे टाकण्यात आले आहे. आता हे केबलचे नेटवर्क शहरातील केबल एजन्सी व इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपन्यांना लीजवर दिल्या जाईल. भूमिगत केबल नेटवर्कमुळे ओव्हरहेड केबलचे जाळे हळूहळू कमी होऊन शहराचे विद्रूपीकरण थांबणार असल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे यांनी केबल ऑपरेटर आणि इंटरनेट सेवा देणाºया कंपन्यांच्या प्रतिनिधीची बैठक घेतली. यावेळी महाव्यवस्थापक (ई-गव्हर्नन्स) शील घुले आणि नागपुरातील प्रमुख केबल ऑपरेटर्स उपस्थित होते.शहरातील केबल ऑपरेटर्स केबल टाकताना पथदिव्यांचे पोल, टेलिफोनचे पोल, झाडावरून व घरावरून केबल नेतात. त्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. तसेच वादळ व पावसामुळे केबल तुटून धोका होण्याचा संभव असतो. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात सर्वत्र भूमिगत केबल टाकण्यात आले आहेत. या अंतर्गत एकंदर ७०० जंक्शन बॉक्सेस आहेत. या जंक्शन बॉक्समधून केबल ऑपरेटर लोकांच्या घरापर्यंत भूमिगत केबल टाकून उत्तम प्रकारची सेवा नागरिकांना देऊ शकतील.एनएसएससीडीसीएल चे फायबर नेटवर्क वापरण्यासाठी केबल ऑपरेटरला निर्धारित शुल्क अदा करावे लागेल. याबाबतचा विस्तृत प्रस्ताव एनएसएससीडीसीएलचे आगामी संचालक मंडळाचे बैठकीत ठेवण्यात येणार असल्याची माहिती मोरोणे यांनी दिली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ही संकल्पना मांडली होती. त्यांच्या पुढाकाराने हा निर्णय घेणारी नागपूर ही देशातील प्रथम स्मार्ट सिटी ठरणार आहे.नागपूर स्मार्ट सिटीच्या ऑप्टिकल केबल नेटवर्कचे वर्गीकरण झोन स्तरावर, वॉर्ड स्तरावर करण्यात आले आहे अशी माहिती अर्नेस्ट अ‍ॅन्ड यंगचे विशाल नंदे यांनी दिली.शुल्क निर्धारणासाठी कमिटीमहेश मोरोणे यांनी लीज शुल्क निर्धारित करण्यासाठी घुले व केबल ऑपरेटर यांची एक कमिटी गठित केली आहे. ही कमिटी पुढच्या आठवडयात निर्णय घेईल. कमिटीच्या अहवालावर केबल ऑपरेटर यांच्या पुढील बैठकीत चर्चा करून अंतिम प्रस्ताव संचालक मंडळच्या पुढे निर्णयासाठी ठेवण्यात येईल.

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा