शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
2
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
3
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
4
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
5
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
6
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
7
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
8
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
9
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
10
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
11
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या
12
प्रेमानंद महाराजांना नेमका कोणता आजार झालाय? यात मृत्यूचा धोका आहे का? जाणून घ्या...
13
हवेतच कतार एअरवेजच्या विमानात बिघाड; अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग, मोठा अपघात टळला!
14
"महाराष्ट्रात राहायची लायकी नाही", बिकिनीतील फोटोंवर आक्षेपार्ह कमेंट, अभिनेत्रीचं सडेतोड उत्तर, म्हणाली...
15
LIC कडून दिवाळीचा 'डबल धमाका'! मध्यमवर्गीयांसाठी २ नवीन 'रिस्क फ्री' योजना लाँच, शेअर झाला रॉकेट
16
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
17
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
18
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
19
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
20
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला

नाशिक संमेलनाध्यक्षपदासाठी सासणे, वाघमारे, अवचटांच्या नावाची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 10:40 IST

Nagpur News नाशिक येथे नियोजित ९४व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली असून, समाजसेवक, चित्रकार डॉ.अनिल अवचट यांना संमेलनाध्यक्ष बनविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नाशिक येथे नियोजित ९४व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी चर्चा सुरू झाली असून, वेगवेगळी नावे पुढे येत आहेत. भारत सासणे, डाॅ.जनार्दन वाघमारे यांच्यासोबतच समाजसेवक, चित्रकार डॉ.अनिल अवचट यांना संमेलनाध्यक्ष बनविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

साहित्य महामंडळ आणि त्या अनुषंगाने होणारे साहित्य संमेलन ही कायम अग्नीची माळ असल्याचे वेळोवेळी पुढे आले आहे. हेवेदावे, द्वेष-मत्सर, आरोप-प्रत्यारोपाचे बिगुल कायम वाजत राहण्याचे नावच साहित्य संमेलने होत, असेच म्हणावे लागेल. २४ जानेवारीला महामंडळाकडून संमेलनाध्यक्षांची घोषणा केली जाणार आहे आणि त्यासाठी घटकसंस्थांनी १२ जानेवारीपासून महामंडळाकडे इच्छुकांची नावे पाठविण्यास सुरुवात झाली आहे. १९ जानेवारी रोजी महामंडळाकडे ही नावे सर्व घटकसंस्थांकडून पोहोचतील. त्यानंतरच सर्वानुमते अथवा बहुमताने अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. त्याच अनुषंगाने विविध पुस्तकांचे लेखक, व्यसनमुक्तीच्या कार्यात अग्रेसर आणि विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी डॉ.अनिल अवचट यांना संमेलनाध्यक्ष करावे, अशी मागणी जोर पकडू लागली आहे. त्यासाठी महामंडळाकडे पत्रही पाठविण्याचे आवाहन करणारी पोस्ट सोशल माध्यमांवर प्रसारित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन दिवसांपासून प्रसिद्ध लेखक भारत सासणे, जनार्दन वाघमारे व डॉ.रवींद्र शोभणे यांच्या नावाची चर्चा होती. त्यात आणखी एका नावाची भर पडल्याने चर्चांचा फड रंगण्यास सुरुवात झाली आहे.

महामंडळ अध्यक्ष विवंचनेत!

साहित्य वर्तुळातून नावांची चर्चा जाहीरपणे केली जात असल्याने कौतिकराव ठाले-पाटील विवंचनेत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी कुणालाच नावांची चर्चा करून संबंधित साहित्यिकांचा अपमान वा अतिरिक्त मान वाढवू नका, असे आवाहन केले आहे.

नागपुरातून अनेक नावांची एक पोस्ट व्हायरल

सोमवारीच नागपुरातून एक पोस्ट व्हायरल झाली आहे. यात आतापर्यंत संमेलनाध्यक्ष न झालेले आणि झालेल्या अध्यक्षांपेक्षा कर्तृत्वाने श्रेष्ठ असलेल्या साहित्यिकांची नावे समाविष्ट आहेत. ऊठसूट कुणालाही संमेलनाध्यक्ष बनविण्यापेक्षा लायक व्यक्तीच्याच गळ्यात ती माळ पडावी, अशी अपेक्षा त्या पोस्टमध्ये व्यक्त केली गेली आहे.

 

.........

टॅग्स :Anil Avchatअनिल अवचट