शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
3
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
4
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
5
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
6
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
7
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
8
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
9
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
10
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
11
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
12
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
13
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
14
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
15
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
16
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
17
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
18
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप
19
Navi Mumbai: पत्नीसह सासूलाही कपडे काढायला लावले अन्...; काळ्या जादूच्या नावाखाली जावयाने सर्व मर्यादा ओलांडल्या!
20
ही तरुणी बनणार मंगळावर पाय ठेवणारी पहिली व्यक्ती, कोण आहे एलिसा कार्सन, म्हणते सुखरूप परतले तर...

लाखोच्या कोळसा चोरीचे प्रकरण न्यायालयात ‘डिस्चार्ज’

By admin | Updated: May 31, 2014 01:01 IST

कळमना पोलिसांनी दाखल केलेले लाखोवर कोळसा चोरीचे एक प्रकरण आज प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. बी. पाटील यांच्या न्यायालयाने तडकाफडकी ‘डिस्चार्ज’ करून दोन्ही ट्रकचालक आरोपींची सुटका केली.

कळमना पोलिसांची अतिरेकी कारवाईनागपूर : कळमना पोलिसांनी दाखल केलेले लाखोवर कोळसा चोरीचे एक प्रकरण आज प्रथम  श्रेणी न्यायदंडाधिकारी एम. बी. पाटील यांच्या न्यायालयाने तडकाफडकी ‘डिस्चार्ज’ करून दोन्ही  ट्रकचालक आरोपींची सुटका केली. जप्त कोळसा वैध असल्याचे कागदोपत्री पुरावे असतानाही पोलिसांनी ही अतिरेकी कारवाई  केल्याचे उघड झाले आहे. प्राप्त माहितीनुसार नंदनवन येथील रहिवासी दिलीप कमलकिशोर सिकची हे श्री कोल कॅरियरचे  मालक असून डिगी कॉटसिन या कंपनीचे ट्रान्सपोर्ट एजंट आहेत. श्री कोल कॅरियरमार्फत ट्रकचालक मोहम्मद मेहतमाम कौसरअली (२४) रा. सद्भावनानगर  सावनेर हा आपल्या एमएच-३१-सीबी-९११५ क्रमांकाच्या ट्रकमधून आणि नाजीर हुसेन सईद  हुसेन (२५) रा. वलनी हा  एमएच -३१-सीजी- ७३५ क्रमांकाच्या ट्रकमधून प्रत्येकी १५.५00  टन कोळशाची वाहतूक करीत होते. कापसी येथील धरमकाट्यामागे असलेले हे दोन्ही ट्रक काल २९ रोजी सायंकाळी ७.४५ वाजताच्या  सुमारास कळमना पोलिसांनी ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. या कोळशाबाबत  अधिकृत कागदपत्रे नाहीत, असे नमूद करून पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम ४१ (१),  अ, ड आणि ३७९ (चोरी) कलमांतर्गत दोन्ही ट्रकचालकांना अटक केली. १ लाख २0 हजार  रुपये किमतीचा ३१ टन कोळसा आणि दोन ट्रक, असा एकूण ९ लाख २0 हजार रुपये किमतीचा  माल जप्त केला. खुद्द हेड कॉन्स्टेबल वसंता कनकदंडे यांनी राज्य सरकारतर्फे फिर्याद नोंदवून ही  कारवाई केली. आज या दोन्ही आरोपी ट्रकचालकांना पोलिसांनी न्यायालयात हजर करून ११ जूनपर्यंंंंत त्यांच्या  न्यायालयीन कोठडीची मागणी केली. आरोपींचे वकील अँड. विलास सेलोकर आणि अँड. सतीश  गडे यांनी पोलिसांनी जप्त केलेला कोळसा अधिकृत असल्याच्या पावत्या आणि इतर दस्तऐवज  न्यायालयात दाखल केले. पोलिसांनी केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाच्या  निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने दस्ताऐवज तपासून हे प्रकरण ‘डिस्चार्ज’ केले आणि दोन्ही  आरोपींची निर्दोष सुटका केली. (प्रतिनिधी)