शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करांना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
4
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
5
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
6
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
7
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
8
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
9
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
10
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
11
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
12
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
13
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
14
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
15
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
16
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
17
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
18
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
19
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
20
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव

आपत्ती व्यवस्थापन कोलमडणार नाही?

By admin | Updated: June 12, 2014 01:12 IST

पूर्व विदर्भात पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे आवश्यक उपकरणांचा तुटवडा आहे. सहा जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात फक्त

नागपूर : पूर्व विदर्भात पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडे आवश्यक उपकरणांचा तुटवडा आहे. सहा जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात फक्त एकच जनरेटर आहे. इतर जिल्ह्यात तो नाही. इतर आवश्यक उपकरणांच्या बाबतीतही अशीच अवस्था असल्याने ही यंत्रणा किती सक्षम आहे याचा प्रत्यय यावा. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती उद््भवली तर बचाव कार्यासाठी जनरेटरची जुळवाजुळव करण्यासाठी धावपळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पावसाळापूर्व नियोजनाचा एक भाग म्हणून नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज करण्याचा दावा केला जातो. त्याचे समन्वयन नियंत्रण विभागीय आयुक्त कार्यालयातून केले जाते. जिल्हा पातळीवर आढावा घेतल्यानंतर विभाग पातळीवर व नंतर राज्य पातळीवर आढावा घेतला जातो. अलीकडेच राज्यपातळीवर अशा प्रकारची बैठक झाली. त्या बैठकीत पूर्व विदर्भातील तयारीची माहिती देण्यात आली. या माहितीनुसार आवश्यक उपकरणांचा प्रत्येक जिल्ह्याकडे तुटवडा असल्याचे दिसून येते. रात्रीच्या वेळी पूरपस्थिती उद््भवली तर मदतकार्यासाठी जनरेटरची गरज भासते. मात्र सहा जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्ह्यात जनरेटर आहे व तोही एकच आहे. पूर्व विदर्भात संभाव्य पुराचा धोका असणारी एकूण ६८६ गावे आहेत. ही संख्या लक्षात घेता नियोजन करणे गरजेचे होते. प्रत्यक्षात तसे झाले नसल्याचे आकडेवारी सांगते. नागपूर जिल्ह्यात २३४, वर्धा जिल्ह्यात ८८, भंडारा जिल्ह्यात १४९, गोंदिया जिल्ह्यात ८७, चंद्रपूर जिल्ह्यातील ८६ आणि गडचिरोली जिल्ह्यातील ४२ गावांना पुराचा धोका असताना या जिल्ह्यांकडे जनरेटर नाही. एकाच दिवशी अनेक गावात पूरपरिस्थिती उद््भवण्याच्या घटना यापूर्वी पूर्व विदर्भात घडल्या आहेत. त्यात नागपूर जिल्ह्याचासुद्धा समावेश आहे.अंधारात मदत कार्यासाठी सर्च लाईटची गरज भासते. नागपूर जिल्ह्यात फक्त ४ सर्च लाईट आहेत. गडचिरोलीत तर एकही नाही. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्राथमिक उपचारासाठी लागणाऱ्या ‘फर्स्ट एड्् किट’यंत्रणेकडे नाही. एकूणच परिस्थिती गंभीर आहे. (प्रतिनिधी)