शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्लास्टीकचे गायब आता स्टीलचे डस्टबिन लावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 22:34 IST

आरोग्य विभागाने इंदोरच्या धर्तीवर शहरात स्टीलचे डस्टबिन लावण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे.

ठळक मुद्दे५०० नग स्टील ट्विन बिनसाठी ९७.४५ लाख रुपये होणार खर्च

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शहरात रस्त्यालगत फुटपाथवर प्लास्टीकचे जुळे डस्टबिन लावण्यात आले होते. परंतु ते वर्षभरही टिकले नाही. प्लास्टीकचे डस्टबिन चोरीला गेले किंवा ते तुटले, याची माहिती मनपाचा आरोग्य विभाग घेत आहे. यातच आरोग्य विभागाने इंदोरच्या धर्तीवर शहरात स्टीलचे डस्टबिन लावण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर केला. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे. याअंतर्गत ६० लीटर क्षमतेचे ५०० नग स्टील ट्विन बिन खरेदीची योजना आहे. यावर ९७.४५ लाख रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे.स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांना प्लास्टीकचे ट्विन डस्टबिन तुटले किंवा गायब झाले याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे माहिती नव्हती. डस्टबिन चोरी झाल्याची किंवा तुटल्याचे प्रकरण आहे, याबाबत माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत निधी मिळाला आहे. याअंतर्गत स्टीलचे ट्विन बिन खरेदी केले जात आहे. इंदोरमध्ये स्टील ट्विन बिन लावण्यात आले आहेत. ते लवकर तुटत नाही. एका ट्विन बिनची किमत १९४९० रुपये आहे.रस्त्यांची सफाई करून मजूर चऱ्याला हातठेल्याने किंवा घंटागाडीच्या माध्यमातून कलेक्शन पॉइंटपर्यंत पोहचवतात. परंतु आता हातठेला किंवा घंटागाडीचा उपयोग न करता व्हील माऊंटेड मुवेबल डस्टबिनचा उपयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला आह. यात मनपा आरोग्य विभागातर्फे जो प्रस्ताव आला त्यात २४० लीटर क्षमतेचे ४ हजार व्हील माऊंटेड डस्टबिन मे नीलकमल लिमिटेडकडून खरदी करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.यात विभागाचे म्हणणे आहे की, नोव्हेंबर २०१७ मध्ये निविदा काढण्यात आली होती. यात नीलकमलकडून संबंधित डस्टबिन खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावर ८७.१२ लाख रुपये खर्च होणार आहे. स्थायी समितीने प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली आहे. परंतु निविदा पुन्हा काढण्याबाबत काहीही स्पष्ट केले नाही.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न