शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कार्पोरेट जगताला जगविण्यासाठी मराठी शाळांची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 00:02 IST

नागपूरच्या ३४ मराठी शाळा बंद केल्यानंतर त्यापाठोपाठ मुंबई महानगरपालिकेनेही २२ मराठी शाळा बंद केल्या आहेत. त्यामुळे मराठी प्रेमीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या शाळा टिकविण्याची व फुलविण्याची जबाबदारी सरकारची आहे. मराठी साहित्य महामंडळाकडून याबाबत महानगरपालिका व शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र या प्रयत्नांना शासनाकडून साधा प्रतिसादही न मिळणे अधिक अस्वस्थ करणारे आहे. त्यामुळे शासन कार्पोरेट जगताला जगविण्यासाठी मराठी शाळा आणि स्वभाषेची अवहेलना करीत असल्याचा आरोप अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे.

ठळक मुद्देसाहित्य महामंडळाचा आरोप : स्वभाषेसाठी सरकार उदासीन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूरच्या ३४ मराठीशाळा बंद केल्यानंतर त्यापाठोपाठ मुंबई महानगरपालिकेनेही २२ मराठीशाळा बंद केल्या आहेत. त्यामुळे मराठी प्रेमीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या शाळा टिकविण्याची व फुलविण्याची जबाबदारी सरकारची आहे. मराठी साहित्य महामंडळाकडून याबाबत महानगरपालिका व शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. मात्र या प्रयत्नांना शासनाकडून साधा प्रतिसादही न मिळणे अधिक अस्वस्थ करणारे आहे. त्यामुळे शासन कार्पोरेट जगताला जगविण्यासाठी मराठी शाळा आणि स्वभाषेची अवहेलना करीत असल्याचा आरोप अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केला आहे.नागपुरात ३४ मराठी शाळा बंद केल्यानंतर त्याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली, ज्यावर सध्या सुनावणी सुरू आहे. मात्र न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असताना मुंबई महापालिकेने तेथील २२ मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. यावरून गावोगावच्या मराठी सेवकांनी स्वत:चा पैसा खर्च करून न्यायालयात लढायचे आणि सरकारने केवळ डोळेझाक करायची काय, असा सवाल साहित्य महामंडळाने उपस्थित केला आहे. राज्य शासनाने नुकतेच राज्यातील लघु व मध्यम उद्योगांमध्ये ८० टक्के कर्मचारी हा मराठी भाषा जाणणारा स्थानिक कर्मचारी असावा, असे परिपत्रक निर्गमित केले आहे. एकीकडे मराठीचा आग्रह धरला असे दाखवायचे आणि दुसरीकडे मराठी शाळांची अवहेलना चालवायची असे दुटप्पी धोरण शासनाने अंगिकारल्याची टीका डॉ. जोशी यांनी केली. ज्यांच्यावर मराठी शाळा चालवायची जबाबदारी आहे, त्यांच्यावर सरकारचे नियंत्रणच नाही. विद्यार्थी मिळत नाही म्हणून स्वभाषिक शाळा बंद करायच्या आणि पालकांवर खापर फोडायचे, हे योग्य नाही. शासनाचे काही आर्थिक, शैक्षणिक धोरण आहे की नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.शासनाने या गंभीर विषयाकडे लक्ष द्यावे यासाठी साहित्य महामंडळाकडून महापौर, आयुक्त, शिक्षणाधिकारी यासह मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांनाही अनेकदा हस्तक्षेपाची विनंती करण्यात आली. मात्र यापैकी कुणी साधा प्रतिसादही दिला नसल्याची खंत डॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केली. यामुळे साधी दखल घेणे तर दूरच, पण प्रश्न हाताळायचेच नाहीत, असे एकमत झाल्यासारखे वागणे सुरू असल्याची टीका त्यांनी केली.एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळांसाठी कार्पोरेट जगताकडून प्रचंड पैसा ओतला जातो आणि दुसरीकडे मराठी शाळा टिकविण्यासाठी सरकार आपले उत्तरदायित्त्व पार पाडत नसल्याचे दिसून येत आहे. आम्ही आताही आशा बाळगून आहोत, शासनाने तातडीने काहीतरी पावले उचलायला हवीत, अशी मागणी डॉ. जोशी यांनी केली.मराठीच्या संघटना काय करतात?मराठी शाळांवर संकट आले असताना, शासन उदासीन असताना मराठीचा पुळका घेणाऱ्या संघटना, राजकीय पक्ष काय करीत आहेत? मराठीचे कार्यक्रम घेणाºया संस्था गप्प आहेत व दुसरीकडे शिक्षकांच्या, पालकांच्या संघटनाही काहीच करीत नसल्याची खंत डॉ. श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केली. या संघटना व नागरिक सरकारवर मराठीसाठी दबाव आणू शकतात, मात्र ते होत नसल्याने साहित्य महामंडळ किंवा आमच्यासारख्यांची सरकार दखलही घेत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे मराठी समाजाला मराठीच नकोय का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :marathiमराठीSchoolशाळा