शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमी : दिले जीवनदान मेलेल्या जीवा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 21:25 IST

दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले विष्णू शेषराव ओव्हाळ ढोलकीच्या तालावर आणि त्यांच्या पत्नी वंदना पेटीच्या स्वरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची प्रेरणा, त्यांचे तत्त्वज्ञान आणि मानवमुक्तीचे कार्य जनसामान्यांमध्ये रुजवीत आहेत.

ठळक मुद्देअंध विष्णू ओव्हाळ पेरतात गाण्यातून बाबासाहेबांचे विचार

नागपूर : कोटी रोग्यांना देवूनी दवा,आला डॉक्टर बनूनी नवा,दिले जीवनदान मेलेल्या जीवा...अशा सोप्या शब्दातील गाण्यातून बाबासाहेबांच्या कार्यांची महती दीक्षाभूमीवर गाऊन उपस्थितांच्या थेट हृदयात साद घातली जात होती. दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले विष्णू शेषराव ओव्हाळ ढोलकीच्या तालावर आणि त्यांच्या पत्नी वंदना पेटीच्या स्वरावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या लढ्याची प्रेरणा, त्यांचे तत्त्वज्ञान आणि मानवमुक्तीचे कार्य जनसामान्यांमध्ये रुजवीत आहेत.दीनदलितांच्या उद्धाराचा मार्ग खुला करून त्यांना उज्ज्वल भवितव्याची दिशा दाखविणाऱ्या युगनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गावागावापर्यंत पोहचविण्याचे समाजमनात रु जविण्याचे मोलाचे कार्य आंबेडकरी जलशांच्या माध्यमामधून झाले. बाबासाहेबांचा परिवर्तनवादी विचार हा या आंबेडकरी जलशांचा प्राण आहे. हीच प्रेरणा घेत जालना जिल्ह्यातील मेठा या गावातील ६० वर्षीय शाहीर विष्णू ओव्हाळ आणि त्यांच्या पत्नी वंदना दीक्षाभूमीवर आले. येथील बोधीवृक्षाखाली बुद्धवंदना घेतली आणि बुद्ध-भीम गीतातून बाबासाहेबांचे विचार पेरायला सुरुवात केली. सूर-तालांच्या आविष्कारात विष्णूचे अंधत्व कुठेच आड येत नव्हते. त्यांना साथ देणारा तरुण अनमोल वाळके याची ढोलकीवरील थाप थेट ऐकणाºयाच्या हृदयाला साद घालत होती. ‘भल्याभल्यांना माझ्या भीमानं, पहा कसं लाजवलं, भारतीय संविधान माझ्या भीमानं दिल्लीत गाजवलं’ या त्याच्या गाण्यावर तर अनेक जण थिरकलेही.विष्णू यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांच्या पुण्याईमुळेच आज गात आहे. आम्हा दोघांना दिसत नसले तरी ज्येष्ठ कवी वामनदादा कर्डक, विष्णू शिंदे आदींची गाणी तोंडपाठ आहे. दीनदलितांच्या उद्धाराचा मार्ग खुला करून त्यांना उज्ज्वल भवितव्याची दिशा दाखविणाऱ्या युगनायक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पोहचविताना मिळणारे समाधान मनाला श्रीमंत करते. असे म्हणत, अनमोल यांनी ढोलकीवर थाप देत लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या ‘उद्धारली कोटी कुळे, भीमा तुज्या जन्मामुळे...’ गाण्याला सुरुवात केली आणि त्यातच ते तल्लीन झाले. त्यांना पेटीवर जयभीम ओव्हाळ साथ देत होते.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीmusicसंगीत