शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमी :  पाच हजार अनुयायांनी घेतली बौद्ध धम्माची दीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 00:53 IST

सोमवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्मदीक्षा विधीला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सलग तीन दिवस हा सोहळा दीक्षाभूमीवर चालणार आहे.

ठळक मुद्देउत्तर भारत, मध्य प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड येथील नागरिकांचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्यानिमित्ताने हातात पंचशील ध्वज अन् शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या निळ्या पाखरांनी दीक्षाभूमी फुलू लागली आहे. सोमवारी सकाळी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्वात बौद्ध धम्मदीक्षा विधीला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. सलग तीन दिवस हा सोहळा दीक्षाभूमीवर चालणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने भदंत सुरेई ससाई यांच्या मार्गदर्शनात दीक्षाभूमीवर धम्मदीक्षा सोहळा आयोजित केला जातो. दरवर्षी सुमारे १२ ते १५ हजारावर लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. या सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी दोन हजार तर दुसऱ्या दिवशी पाच हजार अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यात तरुणांसोबतच महिलांचाही मोठा सहभाग होता. भदंत ससाई यांच्या नेतृत्वात भन्ते नागघोष, भन्ते नागसेन, भन्ते धम्मप्रकाश, भन्ते नागधम्म यांनी अनुयायांना त्रिशरण, पंचशील आणि २२ प्रतिज्ञा देऊन बौद्ध धम्माची दीक्षा दिली.धम्मदीक्षा घेणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यातील अनुयायांचा समावेश होता. बौद्ध धम्माची दीक्षा घेणाऱ्यांकडून धर्मांतरण करण्याबाबत एक प्रतिज्ञापत्र भरून घेण्यात आले. यात त्याचे नाव, गाव पत्ता, कोणता धर्म सोडून बौद्ध धम्माची दीक्षा घेत आहे, याबाबतची माहिती आहे. दीक्षार्थीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने बौद्ध दीक्षा प्रमाणपत्र देण्यात आले. या सोहळ्याकडे स्मारक समितीचे विलास गजघाटे हे विशेष लक्ष ठेवून आहेत. या सोहळ्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्ता रवी मेंढे हे विशेष परिश्रम घेत आहेत.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी