शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

नागपुरात कोविड रुग्णांशी आता डिजिटल संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:06 IST

नागपुरात कोविड रुग्णांशी डिजिटल संवाद साधण्यासाठी ‘टेलिमेडिसीन’ मदत घेतली आहे.

ठळक मुद्देमेडिकलचा पुढाकारवरिष्ठ डॉक्टर थेट रुग्णांशी चर्चा करू शकणार

सुमेध वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी, त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आता वरिष्ठ डॉक्टरच त्यांच्या सेवेत असणार आहेत. यासाठी प्रत्येक वेळी वरिष्ठ डॉक्टरांना त्यांच्या जवळ न जाताही त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांच्या पुढाकाराने हे शक्य होऊ शकले आहे. त्यांनी कोविड रुग्णांशी डिजिटल संवाद साधण्यासाठी ‘टेलिमेडिसीन’ मदत घेतली आहे. याचा फायदाही होताना दिसून येत आहे.

तीन मजल्याच्या ट्रॉमा केअर सेंटरला कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. येथे २०० खाटांचे अतिदक्षता विभाग (आयसीयू) तर ४०० खाटांचे ‘हाय डिपेंडन्सी युनिट’ (एचडीयू) आहे. सध्या १५०वर रुग्ण उपचार घेत आहेत. मेडिकल इमारतीपासून ही इमारत वेगळी आहे. येथे सहायक प्राध्यापक व निवासी डॉक्टर चोवीस तास कार्यरत असतात. त्यांच्या मदतीला सहयोगी व प्राध्यापक डॉक्टर असतात.परंतु वॉर्डात राऊंड घेताना चार-पाच डॉक्टर, परिचारिका यांना फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे शक्य होत नाही. कोविड वॉर्डात अशीही गर्दी करणे धोकादायक ठरू शकते. शिवाय, काही वरिष्ठ डॉक्टरांना उच्च रक्तदाब व मधुमेहाचा आजार आहे.

त्यांचेही वारंवार वॉर्डात जाणे टाळण्यासाठी अधिष्ठाता डॉ. मित्रा यांनी डिजिटल संवाद साधण्याची भूमिका मांडली. त्याला त्यांनी मूर्त स्वरूपही दिले. यामुळे एका कक्षात बसून कोविड वॉर्डातील रुग्णांशी थेट संवाद साधणे वरिष्ठ डॉक्टरांना शक्य झाले आहे.

असा साधला जातो संवादएक ट्रॉलीमध्ये लॅपटॉप बसविण्यात आला आहे. त्याला अधिष्ठाता कक्षातील अत्याधुनिक संगणकाशी जोडण्यात आले आहे. वॉर्डातील डॉक्टर कर्मचाऱ्याच्या मदतीने प्रत्येक रुग्णासमोर ट्रॉली घेऊन जाईल. लॅपटॉपमधून वरिष्ठ डॉक्टर रुग्णांशी संपर्क साधतील. रुग्णाला डॉक्टर तर डॉक्टरला रुग्ण दिसेल. दोघांमध्ये संवाद निर्माण होईल. उपचारात काही बदल करायचे असल्यास त्याचवेळी वरिष्ठ डॉक्टर तेथील डॉक्टरांना सूचना देऊ शकतील. या डिजिटल संवादाची एक स्क्रीन अधिष्ठाता कक्षातही असेल. यामुळे तेही रुग्णांसोबतच उपस्थित डॉक्टरांशी संवाद साधू शकतील.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस