शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय शिक्षण क्षेत्राचे डिजिटलायझेशन

By admin | Updated: March 5, 2017 01:59 IST

येत्या दोन वर्षांत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील कार्यप्रणालीचे संपूर्ण ‘डिजिटलायझेशन’ करण्यात येणार आहे,

कुलगुरू म्हैसेकर : दादासाहेब काळमेघ स्मृती डेन्टल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलच्या आॅडिटोरियमचे उद्घाटन नागपूर : येत्या दोन वर्षांत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील कार्यप्रणालीचे संपूर्ण ‘डिजिटलायझेशन’ करण्यात येणार आहे, अशी ग्वाही महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी येथे दिली. वानाडोंगरी येथील स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती डेन्टल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलमधील आॅडिटोरियमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिकुलगुरू प्रा. डॉ. मोहन खामगावकर, शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालय, मुंबईचे अधिष्ठाता आणि डेन्टल कौन्सिल आॅफ इंडियाचे सदस्य डॉ. मानसिंग पवार, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूरचे माजी अधिष्ठाता डॉ. विनय हजारे, कोषाध्यक्ष आर. एम. सिंग, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. मिलिंद देशपांडे, डॉ. यशवंत पाटील, संस्थेचे अध्यक्ष शरद काळमेघ, हेमंत काळमेघ आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. म्हैसेकर यांनी आपल्या भाषणातून सभागृहाचे सुंदर बांधकाम केल्याबद्दल अभियंता आणि आर्किटेक्टचे अभिनंदन केले. त्यांनी डॉ. मानसिंग पवार यांना ‘स्कीलबेसड् कोर्से’स सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना कोणती समस्या किंवा सल्ला हवा असल्यास ई-मेल करण्याचा सूचनाही दिल्या. सर्वांनाच ‘बायोमेट्रिक’अनिवार्य असल्याचेही त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी) संशोधनाचा फायदा ‘कॉलेज टू व्हिलेज’ यावेळी माजी अधिष्ठाता डॉ. विनय हजारे यांना मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. ते म्हणाले, स्वर्गीय दादासाहेब काळमेघ स्मृती डेन्टल कॉलेज अ‍ॅण्ड हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारचे ‘रिसर्च प्रोजेक्ट’राबविण्यात येतात, त्याचा फायदा ‘कॉलेज टू व्हिलेज’यांना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कामातील पारदर्शकता हीच यशाची गुरुकिल्ली डॉ. मानसिंग पवार म्हणाले, या महाविद्यालयासाठी शरद आणि हेमंत काळमेघ यांचे भरीव योगदान राहिले आहे. त्यांच्या कामातील पारदर्शकता हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. हे कॉलेज एक ‘मॉडेल’ कसे बनेल, याकरिता प्रयत्नरत राहण्याचे आवाहन केले. महाविद्यालयाच्या यशात विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा शरद काळमेघ म्हणाले, ११ वर्षांत या महाविद्यालयाने यशाचे शिखर गाठले. या कॉलेजच्या यशात येथील विद्यार्थ्यांचा सिंहाचा वाटा आहे. येणाऱ्या वर्षांत विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करीत महाविद्यालयाला‘रोल मॉडेल’बनविण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी केले. वैद्यकीय क्षेत्राचा निकाल ‘आॅनलाईन’ डॉ. खामगावकर म्हणाले, विद्यापीठाने गुंतागुंतीच्या कामात पारदर्शकता आणण्याच्या कामाबरोबर अनेक कामात आमूलाग्र बदल घडून आणला आहे. वैद्यकीय क्षेत्राचा निकाल आता ‘आॅनलाईन’ झाला असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. संजय पाटील यांनी केले. संचालन डॉ. सुनीता कुळकर्णी व मरियन थरियन यांनी केले तर आभार सिनेट सदस्य कृष्णा बोंडे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.