शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नागपूरच्या अर्थसंकल्पात धूळफेक; योजना कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 11:28 IST

‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपैया’या म्हणीप्रमाणे महापालिकेचा कारभार आहे. गेल्या एक दशकात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पांचे अवलोकन केले तर प्रत्यक्ष उत्पन्न व अपेक्षित उत्पन्नाच्या आकड्यात मोठी तफावत आहे.

ठळक मुद्देउत्पन्न व खर्चाचा ताळमेळ नाहीअपेक्षित व प्रत्यक्ष उत्पन्नात तफावत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘आमदनी अठन्नी, खर्चा रुपैया’या म्हणीप्रमाणे महापालिकेचा कारभार आहे. गेल्या एक दशकात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पांचे अवलोकन केले तर प्रत्यक्ष उत्पन्न व अपेक्षित उत्पन्नाच्या आकड्यात मोठी तफावत आहे. स्थायी समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी सादर केलेल्या वर्ष २०१९-२० च्या अर्थसंकल्पातही असाच प्रकार आहे. ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. मात्र उत्पन्नाचे स्रोत विचारात घेता उद्दिष्ट साध्य होण्याची शक्यता दिसत नाही.अर्थसंकल्पात घोषणा केली जाते, परंतु त्यानुसार उत्पन्न होत नसल्याने जवळपास ६० टक्के योजनांची अंमलबजावणी होत नाही. महापालिके च्या उत्पन्नाचा अर्धा वाटा वेतन, पेन्शन, वीज, पाणी व मालमत्तांची देखभाल यावर खर्च होतो. त्यानंतर शिल्लक रकमेतून विकास कामे केली जातात. परंतु अर्थसंकल्पात अपेक्षित उत्पन्नाच्या तुलनेत ३० ते ४० टक्के उत्पन्न कमी असते. अशा परिस्थितीत विकास कामासाठी १० ते २० टक्के निधी शिललक असतो. याचा विचार केला तर सादर केलेला अर्थसंकल्प ही धूळफेकच म्हणावी लागेल.वर्ष २०१२-१३ चा महापालिकेच्या स्थायी समितीचा प्रस्तावित अर्थसंकल्प ११२८ कोटींचा होता. प्रत्यक्ष उत्पन्न ९४० कोटी होते. यात १८० कोटींची तफावत होती. वर्ष २०१८-१९ मध्ये २९४६ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, तर उत्पन्न २०१७.७५ कोटी झाले. अर्थसंकल्प व प्रत्यक्ष उत्पन्न यात ९२८.२५ कोटींची तफावत होती. यावेळी प्रदीप पोहाणे यांनी ३१९७.६० कोटींचा अर्थसंकल्प मांडला. प्रत्यक्ष उत्पन्न तितके होईल का, हा संशोधनाचा भाग आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका