शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

पाकिस्तानव्याप्त काश्मीर पाकिस्तानला दान दिले का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 10:01 IST

पाकव्याप्त काश्मीरवरील दावा आपण सोडून ते पाकिस्तानला दान दिले का, याचा खुलासा सरकार, भाजप आणि आरएसएसने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली.

ठळक मुद्दे नियंत्रण रेषेबाबत खुलासा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जम्मू-काश्मीरच्या संविधानानुसार पाकिस्तानव्याप्त काश्मीरसाठी विधानसभेच्या जागा राखीव होत्या. यामुळे त्याचा आपल्याशी संबंध होता. त्या आधारावरच पाकव्याप्त काश्मीरवर आपण दावा करीत होतो. केंद्र्र सरकारने कलम ३७० रद्द करून पाकव्याप्त काश्मीरचे भारताशी असलेले संबंध तोडले आहेत. यामुळे पाकव्याप्त काश्मीरचा संबंध संपला आहे. ज्या जागेसाठी लाखो सैनिक शहीद झाले, त्या पाकव्याप्त काश्मीरवरील दावा आपण सोडून ते पाकिस्तानला दान दिले का, असा सवाल करीत याचा खुलासा सरकार, भाजप आणि आरएसएसने करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत केली. अमेरिकेच्या इशाऱ्यावर जम्मू-काश्मीरचे विभाजन करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, हे कलम रद्द केल्याने आसाम, नागालँड, मिझोरम, मेघालयसह अनेक राज्यांना देण्यात आलेला विशेष दर्जाही आपोआप संपुष्टात येईल. मराठवाडा, विदर्भाला देण्यात आलेला विशेष दर्जाही जाईल. पत्रपरिषदेला आ. बळीराम शिरस्कर, वंचित बहुजन आघाडी विदर्भ प्रमुख राजेंद्र महाडोळे, माजी राज्यमंत्री रमेश गजभिये, माजी पोलीस आयुक्त धनराज वंजारी, संजय हेडाऊ , सागर डबरासे, माजी नगरसेवक राजू लोखंडे, शहराध्यक्ष रवि शेंडे उपस्थित होते.पूरग्रस्तांना शासनाची अजूनही मदत नाहीसरकारकडे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पैसा आहे. परंतु, पूरग्रस्तांसाठी नाही, अशी टीका अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केली. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्हे गेल्या पाच, सात दिवसांपासून पाण्याखाली असताना सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची मदत देण्यात आली नाही. मंत्री, खासदार दौरे करीत आहेत. परंतु पूरग्रस्तांना मदत मात्र मिळालेली नाही. जी काही मदत होत आहे ती केवळ सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.धरणांसाठी नियोजन समिती असावीकर्नाटकमधील आलमट्टी धरणाचे दरवाजे बंद असल्याने नदीचे पाणी लोकांच्या घरात घुसले आहे. हे पूर्णपणे भरल्यास सांगली शहर वर्षभर पाण्याखाली राहील. कृष्णा, आलमट्टी व इतर धरणांच्या नियोजनांसदर्भात एक समिती गठित करण्याची मागणीसुद्धा अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी केली.२८८ जागा लढण्याची तयारीकाँग्रेसकडून अद्याप कोणत्याही प्रकारची बोलणी झाली नाही. चर्चा झाल्यास जागांबाबत ठरवू. आमची सर्व २८८ जागा लढण्याची तयारी आहे, असे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर