शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

मिश्रांच्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 23:35 IST

राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांच्या ‘एलएलबी’च्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या का, असा नागपूर विद्यापीठ प्रशासनाला संशय आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठ प्रशासनाला संशय : कुलगुरूंनी मागितला परीक्षा विभागाकडून अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांच्या ‘एलएलबी’च्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या का, असा नागपूर विद्यापीठ प्रशासनाला संशय आहे. यासंदर्भात कुलगुरूंनी अहवाल मागविला असून, परीक्षा विभागाला तीन ते चार दिवसांत हा अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. २००६ साली परीक्षा मंडळाने मिश्रा यांच्या गुणपत्रिका परत घेण्याच्या व रद्दबातल ठरवीत असल्याचा निर्णय घेतला होता. मात्र या गुणपत्रिकाच ‘बोगस’ असल्याचा विद्यापीठ प्रशासनाला संशय असून त्याची चाचपणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी गांधी विचारधाराप्रकरणी पाठविलेल्या पत्रातील संदर्भानंतर विद्यापीठाने हे पाऊल उचलले आहे.मिश्रा यांनी १९९५ मध्ये ‘एलएलबी’ प्रथम वर्षाची परीक्षा दिली होती. ‘लॉ आॅफ टार्ट’ या विषयाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी त्यांनी परीक्षा विभागात अर्ज केला होता. पुढे कोहचाडे प्रकरणात मिश्रा यांची चौकशी झाल्यानंतर त्यांनी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष व तृतीय वर्षाची गुणपत्रिका विद्यापीठाला परत करत असल्याचा अर्ज तत्कालीन कुलगुरू डॉ.एस.एन.पठाण यांना केला होता. १३ नोव्हेंबर २००६ च्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हे प्रकरण ठेवण्यात आले होते व परीक्षा मंडळाने या तिन्ही गुणपत्रिका परत घेण्याच्या व त्या रद्दबातल ठरवीत असल्याचा निर्णय घेतला होता.गांधी विचारधारा पदविकेत वाङ्मय चौर्यप्रकरणात डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांनी पदविका परत घेण्यासंदर्भात विद्यापीठाला पत्र लिहिले. यात त्यांनी याअगोदरदेखील गुणपत्रिका परत घेण्याचा निर्णय झाल्याचा संदर्भ दिला. नेमक्या कोणत्या गुणपत्रिका विद्यापीठाने परत घेण्याचा निर्णय घेतला होता, याची चौकशी सुरू असताना सुनील मिश्रा यांची गुणपत्रिका बोगस असल्याचा संशय अधिकाऱ्यांना आला. त्यामुळे आम्ही त्यांच्या गुणपत्रिकांची चाचपणी करत आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली. यासंदर्भात तीन दिवसांत अहवाल देण्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.नीरज खटी यांना निर्देश देण्यात आले होते. परंतु परीक्षेचे काम सुरू असल्यामुळे हा अहवाल सादर व्हायला चार ते पाच दिवस लागतील, असे कुलगुरूंनी सांगितले.

 

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर