शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

डायलिसिसच्या रुग्णांनो काळजी घ्या : नेफ्रोलॉजी सोसायटीचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 00:08 IST

नियमित डायलिसिस व वाढत्या वयामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. कोरोना विषाणू संक्रमणाचा अधिक धोका असतो. यामुळे डायलिसिसवर असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन नेफ्रोलॉजी सोसायटीद्वारे करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोरोना संक्रमणाचा धोका : -वुहानमध्ये डायलिसिसवर असलेले १६ टक्के रुग्ण बाधित

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : उपराजधानीतील विविध केंद्रांमध्ये ६०० हून अधिक रुग्ण डायलिसिस करवून घेत आहेत. यातील बहुसंख्य रुग्णांचे वयोमान सुमारे ५० वर्षांवरील आहे. नियमित डायलिसिस व वाढत्या वयामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. कोरोना विषाणू संक्रमणाचा अधिक धोका असतो. यामुळे डायलिसिसवर असलेल्या रुग्णांनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन नेफ्रोलॉजी सोसायटीद्वारे करण्यात आले आहे.चीनच्या वुहान शहरामध्ये एकूण डायलिसिसवर असलेल्या रुग्णांपैकी १६ टक्के रुग्णांना कोरोनाची बाधा झाली होती. डायलिसिसवर असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्युदर हा १५ ते १६ टक्के म्हणजे सामान्य रुग्णांहून तिप्पट अधिक होता. त्यामुळे अशा रुग्णांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर मृत्यूचा धोका तिप्पट असतो, असे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसून येते, असेही सोसायटीचे म्हणणे आहे.कोरोना विषाणूबाधितांना तात्पुरते मूत्रपिंड होण्याचा धोकासामान्य नागरिकांमध्ये कोरोना विषाणूमुळे तात्पुरते मूत्रपिंड निकामे होण्याचे प्रमाण ५ ते १५ टक्के आहे. पूर्णत: मूत्रपिंड निकामी झाले तर मृत्युदर हा ६० ते ९० टक्क्यांपर्यंत जातो. शिवाय ३४ टक्के लोकांना लघवीतून प्रोटिन जाणे सुरू होते आणि २६ टक्के लोकांना लघवीमधून रक्ताच्या पेशी जाणे सुरू होते. अशा सगळ्या परिस्थितीत मूत्रपिंडाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे.प्रत्यारोपणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असतेसोसायटीने असेही म्हटले आहे की, मूत्रपिंड प्रत्यारोपण करताना प्रत्यारोपित मूत्रपिंडाचा शरीराने स्वीकार करावा म्हणून औषधी घेऊन रोगप्रतिकारकशक्ती जाणीवपूर्वक कमी केली जाते. अशा वेळी रुग्णाला कोरोनाचा धोका अधिक असू शकतो. सध्या नागपुरात महिन्याकाठी पाच ते सहा मूत्रपिंड प्रत्यारोपण होत आहेत. मात्र, कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता, मूत्रपिंड प्रत्यारोपण पुढे ढकलणे योग्य ठरेल, अशा मार्गदर्शक सूचना ‘युरोपियन आणि इटालियन’ संघटनाकडून आली आहे.

कुटुंबातील सदस्यांनीदेखील काळजी घ्यावी : डॉ. उखळकर नेफ्रोलॉजिस्ट डॉ. धनंजय उखळकर म्हणाले, डायलिसिस अथवा मूत्रपिंड प्रत्यारोपित रुग्ण असलेल्या कुटुंबातील सदस्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी. या रुग्णांना संक्रमणाचा अधिक धोका असल्याने त्यांना प्रादुर्भाव होण्यासाठी परिवारातील सदस्य कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे किडनी प्रत्यारोपण व डायलिसिस रुग्णांच्या कुटुंबातील प्रत्येकाने अधिक काळजी घेणे क्रमप्राप्त आहे.

मूत्रपिंड प्रत्यारोपण समोर ढकलावे : डॉ. खांडेकर नेफ्रोलॉजी सोसायटीचे अध्यक्ष डॉ. आश्विनकुमार खांडेकर म्हणाले, मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रक्रियेमध्ये रुग्णाची औषधांद्वारे प्रतिकारशक्ती कमी केली जाते. यामुळे अशा रुग्णांना कोरोना विषाणूचा धोका अधिक असतो, अशावेळी जे येत्या काही दिवसात प्रत्यारोपण करवून घेणार आहेत, ते पुढे ढकलणे योग्य राहील.

रुग्णांनी अशी घ्यावी काळजी

  •   सार्वजनिक वाहतुकीचा वापर टाळा
  •  गर्दी ठिकाणी जाऊ नये
  •  दुसऱ्या व्यक्तीपासून सहा फुटाचे अंतर ठेवावे
  •  डायलिसिसवरील वयस्क रुग्णाने नातवांशी खेळणे टाळावे
  •  ताप असेल तर डॉक्टरांना सुचित करावे
  •  घरात औषधांचा साठा करून ठेवावा
  •  कोरोनाग्रस्तांशी संपर्क आला तर सूचना द्यावी.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdialysisडायलिसिस