शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

संवाद संपला, विकास थांबला! नगरसेवकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 21:24 IST

आयुक्तांशी संवाद नसल्याने शहरातील विकास थांबल्याचा सूर मनपाच्या सर्वसाधारण सभेचा होता. स्थगन प्रस्तावावर बुधवारी सलग दुसऱ्या  दिवशीही वादळी चर्चा झाली.

ठळक मुद्देमनपा सभागृहात सलग दुसऱ्या दिवशी स्थगन प्रस्तावावर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नगरसेवक घोटाळेबाज असल्याची प्रतिमा सोशल मीडियावर निर्माण करण्यात आली. शाळा, गडर लाईन, नाल्या अशी अत्यावश्यक कामे थांबली. नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आयुक्त तुकाराम मुंढे प्रतिसाद देत नाहीत. आयुक्तांशी संवाद नसल्याने शहरातील विकास थांबल्याचा सूर मनपाच्या सर्वसाधारण सभेचा होता. स्थगन प्रस्तावावर बुधवारी सलग दुसऱ्या  दिवशीही वादळी चर्चा झाली.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर राजकारण करत आहे. ९ हजार पोलवर दिवे लागले नाही. अत्यावश्यक कामे ठप्प झाली. झाडे लावण्याचे काम थांबले. आयुक्त पैसे नाही म्हणून सांगतात. स्मार्ट सिटीची कामे थांबली. मुंढे आल्यापासून एकाही नगरसेवकाला चेंबरचे काम करता येत नाही. कामे होत नसेल तर आयुक्तांनी नागपुरातून निघून जावे, अशी भूमिका प्रदीप पोहाणे यांनी मांडली. संबंधित नगरसेवकांना काही अडचण निर्माण झाल्यास झोन अधिकाऱ्यांनी कामे सोडविणे आवश्यक आहे.पण ४७ पत्र दिले तरी करवाई होत नाही. अशा अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी संजय महाकाळकर यांनी केली.दिव्या धुरडे म्हणाल्या, आज नगरसेवकाची चेंबर बनविण्याची लायकी ठेवली नाही. वर्कआॅर्डर झालेली कामे थांबवली. इब्राहिम टेलर म्हणाले, प्रभागातील कामे होत नसल्याने नगरसेवकांना शिव्या देत आहेत. कामे होत नसेल तर मनपा बरखास्त करा.रमेश पुणेकर म्हणाले,नितीन साठवणे याच्यावर दाखल करण्यात आलेला गुन्हा मागे घ्यावा. बांगला देश येथे बिर्याणी पार्टी झाली नसताना पार्टी झाल्याचा खोटा प्रचार केला. भागाला मनपा प्रशासनाने बदनाम केल्याने आयुक्तांनी माफी मागावी. हरीश ग्वालबंशी यांनी के. टी.नगर रुग्णालयाचा मुद्दा उपस्थित केला. चांगले काम केले तत्कालीन मुख्यमंत्री यांनी तुकाराम मुंढे याचा सत्कार केला. आता मनपातील भाजप सत्ताधारी मुंढे यांचा विरोध का करीत आहेत असा प्रश्न केला. बंटी कुकडे म्हणाले,नगरसेवकांवर गुन्हा दाखल करणे दुर्दैवी आहे. उद्या नालीच्या खड्ड्यात पडून एखाद्याचा मृत्यू झाल्यास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.मोहम्मद जमाल म्हणाले, नगरसेवकाची कामे थांबली आहे. दिलीप दिवे यांनी आयुक्तांना धारेवर धरले.मनपा शाळेत गरीब मुलांना इंग्रजी शिक्षण मिळावे यासाठी सहा शाळांच्या निविदा काढल्या. परंतु आयुक्तांनी रद्द केल्या. काँग्रेसचे बंटी शेळके व कमलेश चौधरी यांनी आयुक्त यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. आयुक्तांमुळे नागपूर शहरात कोरोनाला प्रतिबंध करण्यात यश मिळाले.४५० बेडचे हॉस्पिटल निर्माण झाले, अशी माहिती दिली. इब्राहीम टेलर, संजय बंगाले, वंदना चाफेकर आदींनी चर्चेत सहभाग घेतला.

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे