शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात कुठूनही करा डायल ११२; लगेच मिळणार पोलिसांची मदत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 08:40 IST

Nagpur News तुम्ही राज्याच्या कोणत्याही गाव, शहरात असा. अडचणीत असाल तर घाबरू नका ! तातडीने ११२ डायल करा. १० ते १२ मिनिटात पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील.

ठळक मुद्देपोलिसांच्या डायल ११२ ची सुरू आहे ट्रायल

नरेश डोंगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : तुम्ही राज्याच्या कोणत्याही गाव, शहरात असा. अडचणीत असाल तर घाबरू नका ! तातडीने ११२ डायल करा. १० ते १२ मिनिटात पोलीस तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला अडचणीतून बाहेर काढतील. होय, राज्य पोलीस दलाच्या डायल ११२ च्या माध्यमातून हे आता शक्य होणार आहे. (Dial 112 from anywhere in the state; Get police help right away!)

 

अडचणीतील नागरिकांच्या मदतीसाठी अद्ययावत अशी डायल ११२ सुविधावजा उपक्रम राज्य पोलीस दलाने कार्यान्वित केला आहे. नागपूर शहर आणि जिल्ह्यातही लवकरच तो सुरू होणार आहे. त्याची ट्रायल सुरू आहे.

चोरी, घरफोडी, खून, बलात्कार, अपघात, हाणामारी, लुटमार अथवा कोणताही गुन्हा घडला की सर्वप्रथम पीडिताला पोलिसांची आठवण येते. पोलीस मदतीला पोहोचतातही. मात्र, उशिराने! कारण घटनास्थळ शोधण्यात त्यांचा बराच वेळ जातो. त्यामुळे सगळे संपल्यावर पोलीस येतात, अशी टीका पोलिसांवर नेहमी केली जाते. त्यातूनच अडचणीतील व्यक्तीला तात्काळ मदत मिळत नसल्याची ओरड होते. ते लक्षात घेऊन राज्य शासनाने अडचणीतील व्यक्तीच्या मदतीसाठी पोलीस तात्काळ घटनास्थळी कसे पोहोचतील, यासंबंधाने अभ्यासपूर्ण नियोजन केले.

त्यातून डायल ११२ ही उपक्रमवजा सुविधा अत्याधुनिक यंत्रणासह नागरिकांच्या मदतीसाठी कार्यन्वित केली. नागपूर शहर आणि जिल्ह्यासह राज्यातील सर्वच जिल्ह्यात ती लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे कुठेही, कुणीही अडचणीत असेल आणि त्याने ११२ डायल केले तर ‘सिंघम’च्या रूपातील पोलीस त्याच्या मदतीला अवघ्या १० ते १२ मिनिटात पोहोचतील. या उपक्रमामुळे गुन्हेगारी नियंत्रण आणि कायदा व सुव्यवस्थेची घडी नीट राखण्यातही पोलिसांना मदत होणार आहे.

 

तात्काळ कळेल लोकेशन

वर्षभरापूर्वीच या उपक्रमाचे मुख्य केंद्र मुंबई आणि नागपुरात सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या. राज्यातील कोणत्याही ठिकाणाहून ११२ वर कुणी फोन केला तर त्याचे लोकेशन या दोन केंद्रात कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना कळेल. त्यामुळे येथील मंडळी त्या त्या ठिकाणच्या पोलिसांना तात्काळ निरोप देतील आणि पोलीस तेथे पोहोचले की नाही, त्याचा मागोवाही घेता येईल

 

३४० कर्मचारी नियुक्त

नागपूर जिल्ह्यात २२ पोलीस स्टेशन आहेत. या उपक्रमासाठी दोन अधिकारी (सुपरवायझर) आणि ३४० कर्मचारी निवडण्यात आले असून, अडचणीत असलेल्या व्यक्तीची तात्काळ मदत कशी करायची, त्याचे प्रशिक्षण त्यांना दिले जात आहे.

 

नवीन वाहने मिळाली

या उपक्रमांतर्गत पोलिसांना नवीन १९ वाहने मिळाली आहेत. आणखी काही वाहनांची गरज आहे. उपलब्ध वाहनांची आणि उपकरणांची ट्रायल सुरू आहे. लवकरच हा उपक्रम जिल्ह्यात सुरू होणार आहे.

राहुल माकणीकर

अतिरिक्त पोलीस अधीक्षक, नागपूर

------

टॅग्स :Policeपोलिस