शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

मधुमेह रुग्णाची फसवणूक करणारे डॉ. जयकुमार दीक्षित यांना ग्राहक मंचचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 23:19 IST

अ‍ॅक्युपंक्चर उपचाराद्वारे मधुमेह बरा करण्याची ग्वाही देऊन रुग्णाची फसवणूक करणारे मुंबई येथील डॉ. जयकुमार दीक्षित, त्यांचा मुलगा डॉ. स्वर्णिम व सून डॉ. पूनम यांच्यावर अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकताच पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला. या निर्णयामुळे तिघांनाही जोरदार दणका बसला.

ठळक मुद्देपाच लाख रुपये दंड ठोठावला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अ‍ॅक्युपंक्चर उपचाराद्वारे मधुमेह बरा करण्याची ग्वाही देऊन रुग्णाची फसवणूक करणारे मुंबई येथील डॉ. जयकुमार दीक्षित, त्यांचा मुलगा डॉ. स्वर्णिम व सून डॉ. पूनम यांच्यावर अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने नुकताच पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला. या निर्णयामुळे तिघांनाही जोरदार दणका बसला.मंचचे अध्यक्ष शेखर मुळे, सदस्य अविनाश प्रभुणे व दीप्ती बोबडे यांनी हा निर्णय दिला. मनोहर खोरगडे असे तक्रारकर्त्या रुग्णाचे नाव असून, ते नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. पाच लाख रुपयांपैकी चार लाख रुपये सेवेत त्रुटी ठेवल्यामुळे व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्यामुळे ग्राहक विधिसेवा निधीमध्ये जमा करण्यात यावे आणि एक लाख रुपये खोरगडे यांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासाकरिता देण्यात यावे, असे मंचने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे.डॉ. दीक्षित मधुमेहावर उपचार करण्यासाठी विविध शहरांमध्ये जात असतात. त्यांनी पोटात कोणतेही औषध न देता मधुमेह पूर्णपणे बरा करण्याची वृत्तपत्रामध्ये जाहिरात दिली होती. त्यामुळे खोरगडे दीक्षित यांच्याकडे गेले. खोरगडे यांनी सुमारे २३ महिने हा उपचार करून घेतला, परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. खोरगडे यांनी जाब विचारल्यावर पुढील उपचार नि:शुल्क करण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर जवळपास दीड-दोन वर्षे त्यांच्यावर नि:शुल्क उपचार करण्यात आले, तरीही खोरगडे यांच्या प्रकृतीत काहीच फरक पडला नाही. प्रकृती एकदम बिघडल्यावर डॉ. दीक्षित यांनी त्यांना अ‍ॅलोपॅथीची औषधे दिली. त्यामुळे डॉ. दीक्षित यांचा खोटेपणा उघड झाल्याने खोरगडे यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली. दरम्यान, डॉक्टरने यावर उत्तर सादर केले. आमच्याकडील २४ टक्के रुग्ण बरे होतात. तक्रारकर्त्याने नियमित उपचार घेतले नाही. त्यामुळे त्यांना गुण आला नाही. वृत्तपत्रातील जाहिरात आपण दिली नव्हती, असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मंचने विविध बाबी लक्षात घेता, हा निर्णय दिला.एका सुईचे एक हजार रुपयेखोरगडे यांनी आठ हजार रुपये भरून नोंदणी केली. कानाला सुई टोचून अ‍ॅक्युपंक्चर उपचाराद्वारे मधुमेह बरा करण्यात येईल, असे त्यांना सांगण्यात आले. महिन्यातून दोनदा सुई टोचायची होती व एक वेळ सुई टोचण्याचे त्यांच्याकडून एक हजार रुपये घेण्यात आले.

 

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे