शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

अल्पवयीन मुले चालवितात ‘धूम स्टाईल’ बाईक

By admin | Updated: February 19, 2016 03:16 IST

वाहतूक नियम आणि मोटरवाहन कायद्याचे धडधडीत उल्लंघन करीत अल्पवयीन मुले अधिकृत परवान्याविना ‘धूम

नागपूर : वाहतूक नियम आणि मोटरवाहन कायद्याचे धडधडीत उल्लंघन करीत अल्पवयीन मुले अधिकृत परवान्याविना ‘धूम स्टाईल’ वाहने चालवित आहेत. नागपूरच्या रस्त्यांवर १२ लाख दुचाकी वाहने धावत आहेत. बहुतांश वाहनचालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. २०१४ मध्ये ५ हजार ४६ दुचाकी वाहनस्वारांनी रस्त्यांवरील अपघातात आपले प्राण गमावलेले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती प्रदीप देशमुख यांच्या खंडपीठाने हा गंभीर विषय स्वत:हून जनहित याचिका म्हणून स्वीकारून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय, राज्य वाहतूक विभाग, वाहतूक आयुक्त, आरटीओ, नासुप्र, मनपा आणि शिक्षण सचिवांना तीन आठवड्यात उत्तर दाखल करणारी नोटीस जारी केली. आपले दुचाकी वाहन घेऊन शिकवणी वर्गाला जात असताना एका १५ वर्षीय मुलाने रस्त्याने जात असलेल्या एका महिलेला धडक दिली होती. तिच्या डोक्याला जबर दुखापत झाली होती. तिला एका खासगी इस्पितळात दाखल करताच तिचा मृत्यू झाला होता. या प्राणांतिक अपघातास कारणीभूत ठरलेला हा मुलगा अल्पवयीन असल्याने त्याच्याविरुद्ध प्रथम खबरी अहवाल दाखल झाला नाही.त्याला बाल हक्क कायद्याचे संरक्षण मिळाले. त्याला बाल न्याय मंडळापुढे हजर करून कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. या बालकाविरुद्धचे आरोपपत्र रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी त्याच्या आई-वडिलाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने हे प्रकरण वेगळे ठेवले होते. शेकडो मुले मोटरसायकली आणि जास्त अश्व शक्तीच्या स्कूटर कोणत्याही अधिकाराविना चालवितात. या गंभीर प्रकारावर उच्च न्यायालयाने अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांना न्यायालय मित्र नेमून सर्वंकष याचिका दाखल करण्यास सांगितले होते. त्यानुसार त्यांनी ही जनहित याचिका दाखल केली. आज शाळा, महाविद्यालय आणि शिकवणी वर्गाला जाणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या हातात पालक मोटरसायकल किंवा स्कूटरच्या चाव्या देतात. रस्त्याने जाताना ही मुले भरधाव आणि बेदरकारपणे वाहने चालवितात आणि अपघाताला निमंत्रण देतात. १६ वर्षाच्या मुलांना ५० सीसी इंजीन असलेले दुचाकी वाहन चालविण्याचा परवाना मिळू शकतो. परंतु आज ही मुले १०० ते १५० सीसीचे इंजीन असलेली वाहने भररस्त्यांवर चालवितात. त्यामुळे गंभीर चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे मुलांकडून धूम स्टाईल वाहने चालविण्याचा प्रकार रोखणे आवश्यक आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. न्यायालयात न्यायालय मित्र म्हणून अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर, राज्य सरकारच्या वतीने सहायक सरकारी वकील कल्याणी देशपांडे तर केंद्र सरकारच्या वतीने अ‍ॅड. मुग्धा चांदूरकर यांनी बाजू मांडली. (प्रतिनिधी)