शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धोनी प्रतिभावान खेळाडूंना नागपुरात प्रशिक्षण देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 09:48 IST

एमएस धोनी क्रिकेट अकादमीने मध्य भारतात पहिली अकादमी नागपुरात सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला असून वर्धा मार्गावर गायकवाड -पाटील इंटरनॅशनल शाळेच्या परिसरात निवासी प्रशिक्षणाची सोययेत्या सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देसात वर्षांखालील मुलांना मिळणार प्रवेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नव्या दमाचे खेळाडू घडविण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी हा पुढाकार घेत आहे. एमएस धोनी क्रिकेट अकादमीने मध्य भारतात पहिली अकादमी नागपुरात सुरू करण्याचा मनोदय व्यक्त केला असून वर्धा मार्गावर धुटी शिवारात असलेल्या गायकवाड -पाटील इंटरनॅशनल शाळेच्या परिसरात एसजीआर स्पोर्टस् अकादमीतर्फे निवासी प्रशिक्षणाची सोय लवकरच येत्या सप्टेंबरपासून उपलब्ध होणार आहे.२००० साली १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे खेळाडू आणि एमएस धोनी अकादमीचे व्यवस्थापकीय संचालक मिहिर दिवाकर यांनी सोमवारी पत्रकारांना ही माहिती दिली. धोनी सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यात व्यस्त आहे, पण वेळ मिळेल तसा तो युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यास येथे येईल, असे दिवाकर यांनी सांगितले.याआधी लखनौ, वाराणसी, नोएडा आणि बोकारो येथे अकादमी उघडण्यात आली असून निवासी स्वरूपाची नागपुरात पहिली अकादमी असेल. येथे खेळाडूंना शिक्षणाचीही सोय राहील, असे ते म्हणाले.सात वर्षांखालील मुलांना येथे प्रवेश दिला जाईल. याशिवाय महिला क्रिकेटला प्रोत्साहन म्हणून चाचणीच्या माध्यमातून निवडण्यात येणाऱ्या स्थानिक ११ क्रिकेटपटूंना मोफत प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली. या परिसरात सुसज्ज असे मैदान तयार करण्यात आले असून ४०० खेळाडूंच्या निवासाचीदेखील व्यवस्था असल्याचे गायकवाड- पाटील ग्रुपचे चेअरमन मोहन गायकवाड यांनी सांगितले. एसजीआर स्पोर्टस् अकादमीचे प्रमुख मंगेश राऊत यांनी सांगितले की अकादमीतील मुलांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. यावेळी धोनी अकादमीचे आॅपरेशन हेड सोहेल रौफ, लवलेश राऊत, शाळेच्या प्राचार्य शाबिह चौरसिया यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

टॅग्स :M. S. Dhoniएम. एस. धोनी