लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांच्या मनगटात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फुंकले ती दीक्षाभूमी ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सजू लागली आहे. माणसामाणसातील उचित व्यवहाराचं आचरणशील प्रतीक मानलं जाणाऱ्या पंचशील ध्वजांनी अवघी दीक्षाभूमी सजली आहे. सोमवारी पंचशीलेचा ध्वज खांद्यावर घेऊन ‘जयभीम’च्या जल्लोषात देश-विदेशातून निळ्या पाखरांचे थवे दीक्षाभूमीवर पोहोचण्याचे सत्र अविरत सुरू होते.शतकानुशतकापासून चालत आलेल्या वर्गव्यवस्थेला जिथे बाबासाहेबांनी मूठमाती दिली तो दिवस म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिन. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ ला धर्मांतर करून लाखो शोषितांच्या जीवनात बदल घडवून आणले. त्या दिवसाचे स्मरण व्हावे, बाबासाहेबांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक व्हावे या उद्देशातून देशाच्या कानाकोपºयातून आंबेडकरी अनुयायी जयभीमचे नारे देत दीक्षाभूमीला येतात. ऊन-पावसाची पर्वा न करता निळे पाखरांचे हे थवे सोमवारी रात्री उशिरापर्यंत दीक्षाभूमीवर उतरत होते. अनुयायांची गैरसोय होऊ नये यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, समता सैनिक दल, पोलीस प्रशासन, महानगरपालिका व आरोग्य सेवा विभाग परिश्रम घेत आहे. दीक्षाभूमीचा स्तुप आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे. भव्य धम्ममंच, पंचशीलाचे झेंडे आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.कर्नाटकातून आले ‘निळे वादळ’
धम्मचक्र प्रवर्तन दिन : पंचशील ध्वजांनी सजली दीक्षाभूमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 22:16 IST
ज्या भूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांच्या मनगटात आत्मविश्वास आणि पायात जिद्दीचे बळ फुंकले ती दीक्षाभूमी ६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सजू लागली आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिन : पंचशील ध्वजांनी सजली दीक्षाभूमी
ठळक मुद्दे देश-विदेशातून आलेल्या अनुयायांची दीक्षाभूमीवर गर्दी