शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

धाकडेंची व्हायोलिन अन् खाडिलकरांच्या स्वरांची रसिकांवर चालली जादू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 01:17 IST

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सुरू असलेल्या २८ व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी नागपूरकर रसिकांवर सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी आणि प्रख्यात गायिका आशा खाडिलकर यांच्या स्वरांची जादू चालली. रसिकांनी दोघांनाही भरभरून दाद देत कार्यक्रम उचलून धरला.

ठळक मुद्देअडागळे आणि गलपट यांचा सत्कार : डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या वतीने सुरू असलेल्या २८ व्या डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती संगीत समारोहाच्या दुसऱ्या दिवशी नागपूरकर रसिकांवर सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी आणि प्रख्यात गायिका आशा खाडिलकर यांच्या स्वरांची जादू चालली. रसिकांनी दोघांनाही भरभरून दाद देत कार्यक्रम उचलून धरला. 

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाचा शुभारंभ ज्येष्ठ बॅण्ड वादक दयाराम अडागळे व ज्येष्ठ एकपात्री नकलाकार मुस्कुराओ उपाख्य सर्जेराव गलपट यांच्या हस्ते करण्यात आला. दमक्षे सांस्कृतिक केंद्राचे संचालन डॉ. दीपक खिरवडकर यांच्या हस्ते दोन्ही विदुषींचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्कार भारती नागपूर अध्यक्ष कांचन गडकरी उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात सुरमणी पं. प्रभाकर धाकडे गुरुजी यांचे व्हायोलिन वादन झाले. यावेळी त्यांनी राग वाचास्पतीवर व्हायोलिन वादनास सुरुवात केली. व्हायोलिनच्या लयीमध्ये रसिक हळूहळू समेवर यायला लागले आणि त्यानंतर ‘लागे कलेजवा कटार’ ही वसंतरावांची ठुमरी व्हायोलिनवर सादर करण्यास सुरुवात करताच रसिकांच्या हृदयातून उत्स्फूर्त दाद मिळण्यास सुरुवात झाली. व्हायोलिनच्या स्वरांची गती जसजशी वाढत होती, तसतशी रसिकांच्या सांगितिक आसक्ती वाढत असल्याचे जाणवत होते. राम यमनमध्ये धाकडे गुरुजींनी वादनाचा समारोप केला. त्यांना तबल्यावर संदेश पोपटकर यांनी संगत केली.दुसºया सत्रात आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका आशा खाडिलकर यांच्या शास्त्रीय-उपशास्त्रीय गायकीचा आत्मिक आनंद रसिकांना उपभोगता आला. गायनातून त्यांनी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या चतुरस्र गायकीचे विविध पैलू सादर केले. त्यात वसंरावांनी गायलेली ठुमरी, नाट्यसंगीत, भावगीत, भक्तिगीत आदींचा समावेश होतो. जोगकंस रागाने त्यांनी गायनास सुरुवात केली.‘सावरे अईजई यो’द्वारे त्यांनी गायनास पुढच्या टप्प्यावर नेण्यास सुरुवात केली. समारोपाला स्वातंत्र्यवीर सावकरकरांनी रचलेले ‘शतजन्म शोधताना’ हे गीत सादर करीत रसिकांची वाहवा लुटली. निवेदनाची बाजू विघ्नेश जोशी यांनी सांभाळली. जोशी यांनी वसंतरावांच्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रम माहितीपूर्ण केला. तर संगत गायक म्हणून नचिकेत देसाई, चैतन्य कुळकर्णी, केतकी विश्वास यांनी साथ दिली. संवादिनीवर केदार भागवत, तबल्यावर प्रसाद जोशी, व्हायोलिनवर शिरीष भालेराव यांनी संगत केली.आज ‘संगीत देवबाभळी’संगीत समारोहाच्या तिसऱ्या दिवशी मंगळवारी ३० जुलै रोजी संध्याकाळी ६.३० वाजता प्राजक्त देशमुख लिखित व दिग्दर्शित मराठी संगीत नाटक ‘देवबाभळी’ सादर होणार आहे.वसंतरावांचीच प्रेरणा ‘सावरकर’ गायला लागले - आशा खाडिलकरवसंतरावांच्या गायकीचे विविध पैलू होते. गायकीतील सगळे प्रकार त्यांनी हाताळले. त्यांची गायकी आभाळाएवढी होती. मी त्यांची शिष्य नसतानाही मला त्यांनी माझ्या वयाच्या १६ व्या वर्षी आशीर्वाद दिले. ‘शांकुतल ते मानापमान’ या कार्यक्रमात त्यांनी मला बोलावले होते आणि त्याच कार्यक्रमापासून मी प्रकाशात आले. त्यांच्याच प्रेरणेने पुढे सावरकरांच्या रचना गाण्यास सुरुवात केल्याचे आशा खाडिलकर म्हणाल्या.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर