शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

दोन वर्षात झालेल्या विकास कामांची होणार चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 10:09 PM

महापालिकेमध्ये काम करणारे ठेकेदार हे मनपाच्या निधीतून होणारे काम करण्यापेक्षा शासनाकडून अनुदान रुपात आलेल्या निधीशी संबंधित काम करण्यास पसंती दर्शवित आहे. काही कामांचे कार्यादेश होऊनही, बऱ्याच काळापासून ते अटकले आहे. या संदर्भात स्थायी समिती सदस्य वर्षा ठाकरे यांनी आक्षेप घेतला. त्या आधारे समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी गेल्या दोन वर्षात ठेकेदारांकडून झालेल्या कामांची चौकशी करण्याचे निर्देश दिले.

ठळक मुद्देस्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश : कार्यादेश दिल्यानंतरही ठेकेदार करीत नाही काम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेमध्ये काम करणारे ठेकेदार हे मनपाच्या निधीतून होणारे काम करण्यापेक्षा शासनाकडून अनुदान रुपात आलेल्या निधीशी संबंधित काम करण्यास पसंती दर्शवित आहे. काही कामांचे कार्यादेश होऊनही, बऱ्याच काळापासून ते अटकले आहे. या संदर्भात स्थायी समिती सदस्य वर्षा ठाकरे यांनी आक्षेप घेतला. त्या आधारे समितीचे अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी गेल्या दोन वर्षात ठेकेदारांकडून झालेल्या कामांची चौकशी करण्याचे निर्देश दिले. तसेच ज्या कामाचे कार्यादेश झाल्यानंतरही ठेकेदारांनी काम केले नाही, असे काम रद्द करण्याचे आदेश सुद्धा दिले आहे. याबाबत चौकशी करण्यासाठी मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेत अधीक्षक अभियंत्याने चौकशी करून त्याचा अहवाल स्थायी समितीपुढे सादर करावा, अशा सूचना केल्या आहे.स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महिन्याभरात चौकशी अहवाल सादर करावा लागेल. ज्या कामांचे कार्यादेश जारी केले आहे, तरी सुद्धा ठेकेदार मुद्दाम काम करीत नाही, अशा सर्व कामांची चौकशी करण्यात येणार आहे. जे काम अद्यापही झालेले नाही, त्या कामांचे कार्यादेश रद्द करण्यात येणार आहे. जर जागा विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्लिअर करून दिली नाही, तर अधिकाºयांना जबाबदार ठरविण्यात येणार आहे.सत्तापक्षाकडून ‘दबावतंत्र’जानेवारी २०१९ पासून ठेकेदारांचे बिल दिले नाही. स्थायी समितीला राज्य शासनाकडून मिळालेल्या १५० कोटी रुपयांच्या विशेष अनुदानातून थकीत असलेले बिल देण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडून सादर करण्यात आला होता. यात मे पर्यंतचे सर्व बिल देण्यासंदर्भात प्रस्ताव वित्त विभागाचा होता. परंतु स्थायी समितीने हा विषय स्थगित ठेवला. मिळालेल्या माहितीनुसार सत्तापक्ष जानेवारी महिन्याचे बिल क्लिअर करण्याच्या मानसिकतेत आहे. बिल न मिळाल्यामुळे ठेकेदारांनी एकत्र येऊन काम बंद केले होते. त्यामुळेच स्थायी समितीने दोन वर्षाच्या कामांची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे. त्याचबरोबर थकीत बिल देण्याचा प्रस्तावही थांबवून ठेवला आहे. सत्तापक्ष ठेकेदारांवर दबावतंत्राचा वापर करीत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी जास्तीत जास्त काम करणे व किमान पेमेंट करणे असा सत्तापक्षाचा फॉर्म्युला आहे. यासंदर्भात मनपाच्या ठेकेदार संघटनेची भाजपा शहर अध्यक्ष प्रवीण दटके यांच्याशी बैठक झाली होती, बैठकीत ठेकेदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगण्यात येते.१५ दिवसात महत्त्वाच्या कामांची फाईल तयार करा२०१९-२० अंतर्गत पंडित दीनदयाल उपाध्याय अंतर्गत रस्ता सुधार कार्यक्रमांतर्गत रस्त्याची दुरुस्ती, देखभाल, डागडुजीची फाईल येणाºया १५ दिवसात तयार करून मंजुरीसाठी सादर करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आहे. अध्यक्षांचे म्हणणे आहे की, झोन अंतर्गत कामाची प्राथमिकता ठरवून कामांची फाईल तयार करावी, त्याला मंजुरी देण्यात येईल. गेल्यावर्षी कामे उशिरा झाल्याने त्याचा आर्थिक परिणाम बजेटवर झाला होता. प्रत्येक प्रभागात किमान ८० लाख रुपयांची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळे नगरसेवकांनी आपल्या एरियामध्ये करण्यात येणाºया कामांची फाईल तयार करून झोन कार्यालयामार्फत सादर करावी. त्यानंतर आवश्यक कार्यवाही केली जाईल.मनपाच्या जमिनीवरून अतिक्रमण हटवाग्रेट नाग रोडवर नासुप्र सभागृहाच्या बाजूला मनपाची जागा आहे. या जागेवर वॉशिंग सेंटर, नर्सरी, कार बाजार आदींनी अतिक्रमण केले आहे. या अतिक्रमणाला तत्काळ हटविण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका