शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

इंदूरच्या धर्तीवर नागपूरचा विकास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 01:34 IST

एके काळी अस्वच्छ शहरात गणती होणाऱ्या मध्य प्रदेशातील इंदूर शहराने सक्षम अधिकारी, कठोर निर्णय, लोकजागृती आणि राज्य सरकारचे पाठबळ या जोरावर देशातील सर्वात सुंदर शहर होण्याचा मान मिळविला आहे. विकासाच्या बाबतीत इंदूर नागपूर शहराच्याही मागे होते, म्हणूनच इंदूरचे पथक गतकाळात नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले होते. आज या शहराने स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहराला मागे टाकले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे पथक लवकरच इंदूर शहराच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे.

ठळक मुद्देमनपाचे पथक अभ्यास दौऱ्यावर जाणार : पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा समावेश

लोकमत इमपॅक्टलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एके काळी अस्वच्छ शहरात गणती होणाऱ्या मध्य प्रदेशातील इंदूर शहराने सक्षम अधिकारी, कठोर निर्णय, लोकजागृती आणि राज्य सरकारचे पाठबळ या जोरावर देशातील सर्वात सुंदर शहर होण्याचा मान मिळविला आहे. विकासाच्या बाबतीत इंदूर नागपूर शहराच्याही मागे होते, म्हणूनच इंदूरचे पथक गतकाळात नागपूरच्या अभ्यास दौऱ्यावर आले होते. आज या शहराने स्वच्छतेच्या बाबतीत नागपूर शहराला मागे टाकले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे पथक लवकरच इंदूर शहराच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार आहे.इंदूर स्वच्छतेच्या बाबतीत देशात नंबर वन होण्याची केलेली किमया नागपुरात का होत नाही. यासाठी ‘लोकमत’वृत्तपत्र समूहाच्या चमूने थेट इंदूर शहरात जाऊन शहराने केलेल्या किमयेविषयी महापौर,आयुक्त व नागरिकांशी चर्चा केली. या शहराच्या स्वच्छता कार्याविषयीची मालिका प्रकाशित केली जात आहे. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने पदाधिकारी व अधिकाऱ्यांचे एक पथक इंदूर दौºयावर पाठविण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा यांनी शनिवारी दिली.या पथकात स्थायी समितीचे पदाधिकारी व सदस्य, आयुक्त वीरेंद्र सिंह यांच्यासह अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. इंदूर शहराच्या धर्तीवर नागपूरही स्वच्छतेच्या बाबतीत नंबर वन व्हावे, यामागील हेतू असल्याची माहिती कुकरेजा यांनी दिली.कचरा उचलण्यासाठी १५ दिवसात निविदानागपूर शहरातील क चरा संकलन व वाहतूक करण्याची जबाबदारी मे. कनक रिसोर्सेस प्रा.लि. यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र शहरातील कचरा उचलण्यासंदर्भात असलेल्या नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारी विचारात घेता, कचरा उचलण्याचा कनक रिसोर्सेसचा कंत्राट रद्द करून नवीन कंत्राटदाराला हा कंत्राट दिला जाणार आहे. याबाबतच्या निविदा १५ दिवसात काढण्यात येतील, अशी माहिती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिली.वाढीव दर देण्याचा प्रस्ताव स्थगितमहापालिका प्रशासनाने २०१६ पासून कचरा उचलण्याचा प्रति टन १३०६.८५ रुपये दर ठरविला होता. नवीन निविदा प्रक्रिया होईपर्र्यंत हा दर कायम राहणार आहे. त्यानुसार होणाऱ्या फरकाची रक्कम देण्याला मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थगित ठेवण्याचा निर्णय समितीने घेतला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाnagpurनागपूर