शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
3
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
4
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
5
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
9
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
11
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
12
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
13
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
14
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
15
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
16
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
17
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
18
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
19
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
20
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड

बुद्धीचा विकास कोणत्याही औषधाने होत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:28 IST

बुद्धीचा विकास कोणत्याही औषधामुळे होत नाही. बुद्धी जेवढी वापरली जाईल, तेवढी ती तीक्ष्ण होत जाते, असे मत प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देचंद्रशेखर मेश्राम ‘नॅशनल ब्रेन वीक’चे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : बुद्धीचा विकास कोणत्याही औषधामुळे होत नाही. बुद्धी जेवढी वापरली जाईल, तेवढी ती तीक्ष्ण होत जाते, असे मत प्रसिद्ध न्यूरॉलॉजिस्ट डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी व्यक्त केले.इंडियन अकॅडेमी आॅफ न्यूरॉलॉजीच्यावतीने आयोजित ‘नॅशनल ब्रेन वीक’चे रविवारी अतिरिक्त महापालिका आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते तज्ज्ञ वक्ते म्हणून बोलत होते. अन्य तज्ज्ञ वक्त्यांमध्ये डॉ. सुधीर भावे, डॉ. नितीन चांडक व डॉ. पौर्णिमा करंदीकर यांचा समावेश होता. हा कार्यक्रम आयटी पार्कमधील पर्सिटंट सभागृहात झाला. मेंदू हा मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. त्यावर व्यक्तीचे वर्तमान व भविष्य अवलंबून असते. त्यामुळे मेंदूची सर्वाधिक काळजी घेतली पाहिजे. चांगला आहार घेणे, वाचन करणे, शब्दकोडे सोडविणे, नवनवीन गोष्टी शिकणे, छंद बाळगणे, सकारात्मक विचारसरणी या बाबींमुळे मेंदूचा विकास होतो. दारू, तंबाखू, जंकफूड, धुम्रपान, टीव्ही, मोबाईल, तणाव या गोष्टी मेंदूकरिता धोकादायक आहेत असे मेश्राम यांनी पुढे बोलताना सांगितले.डोकेदुखीचे दोन भाग केले जातात. एका भागामध्ये अर्धशिशी, तणावामुळे होणारी डोके दुखी इत्यादीचा तर, दुसऱ्या भागामध्ये ब्रेनट्युमरसारख्या गंभीर आजारांचा समावेश होतो. देशातील १५ टक्के नागरिकांना अर्धशिशीचा त्रास आहे. जीवनात प्रथमच व अचानक डोकेदुखी सुरू होणे धोकादायक आहे. अशावेळी तात्काळ आवश्यक तपासण्या केल्या पाहिजे असे डॉ. चांडक यांनी सांगितले.मेंदूमधील सर्व पेशी आपापल्या जबाबदाºया योग्य पद्धतीने पार पाडत असेपर्यंत घाबरण्याचे काहीच कारण नसते. परंतु, एकाही पेशीने स्वत:ची जबाबदारी अमान्य करून दुसºया पेशींच्या कामात लुडबुड केल्यास समस्या निर्माण होतात अशी माहिती डॉ. करंदीकर यांनी दिली.मेंदूच्या आजाराची लक्षणे स्पष्टपणे दिसून येतात. आजारी व्यक्तीच्या वागण्याबोलण्यात फरक दिसून येतो. अशावेळी तत्काळ उपचार करून घेतले पाहिजे याकडे डॉ. भावे यांनी लक्ष वेधले.ठाकरे यांनी अकॅडेमीच्या उपक्रमांची प्रशंसा केली. अकॅडेमीच्या उपक्रमांमुळे नागपूरकरांचे जीवन समृद्ध झाले आहे असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी आॅस्कर पुरस्कार मिळालेला मेंदूच्या प्रभावशालीतेवर आधारित ‘रेन मॅन’ हा चित्रपट सादर करण्यात आला व ‘नॅशनल ब्रेन वीक’ पोस्टरचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. सुपंथा भट्टाचार्य यांनी चित्रपटाचे समीक्षण केले.

टॅग्स :Healthआरोग्य