शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा विकास आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 10:39 IST

समाज कल्याणाकरिता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा विकास होणे आवश्यक आहे असे मत इन्फोसेप्ट टेक्नॉलॉजी कंपनीचे टेक्निकल अ‍ॅडव्हायझर अभियंता स्वप्निल देशमुख यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देइन्फोसेप्ट टेक्नॉलॉजी कंपनीचे टेक्निकल अ‍ॅडव्हायझर अभियंता स्वप्निल देशमुख यांचे मत  ‘वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन डे’ कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समाज कल्याणाकरिता ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा विकास होणे आवश्यक आहे. येणाऱ्या काळात ही प्रणाली अधिक विकसित करण्यासाठी सखोल संशोधन व्हायला हवे, असे मत इन्फोसेप्ट टेक्नॉलॉजी कंपनीचे टेक्निकल अ‍ॅडव्हायझर अभियंता स्वप्निल देशमुख यांनी व्यक्त केले.दि इन्स्टिट्युशन आॅफ इंजिनियर्स नागपूर केंद्र व इन्स्टिट्युशन आॅफ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड टेलिकम्युनिकेशन इंजिनियर्स नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी ‘वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अ‍ॅन्ड इन्फर्मेशन सोसायटी डे’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी देशमुख यांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्वांच्या कल्याणाकरिता सकारात्मक उपयोग’ विषयावर सखोल मार्गदर्शन केले. आयोजक संघटनांचे पदाधिकारी मिलिंद पाठक, अजय सावटकर, सुरेश रांगणकर व एम. डी. दाते व्यासपीठावर उपस्थित होते.‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे रोजगार हिरावला जाईल अशी भीती व्यक्त केली जाते, परंतु त्यात तथ्य नाही. मनुष्यबळाला अडचणींवर मात करण्यासाठी व समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करणे हा ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा उद्देश आहे. गेमिंग इंडस्ट्रिजमध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा सर्वाधिक उपयोग केला जात होता. त्यातून या उद्योगक्षेत्राला झालेला फायदा लक्षात घेता इतरांनी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. वर्तमान काळात बहुतांश ठिकाणी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा वापर होत आहे, असे देशमुख यांनी सांगितले.सुरक्षा, अंतराळ संशोधन, कृषी, आरोग्य विज्ञान, हवामान इत्यादी क्षेत्रात ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ समाज कल्याणाचे कार्य करीत आहे. बॉम्ब शोधून काढणारे व ते निकामी करणारे रोबोटस् ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चाच भाग आहे.‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’मुळे येणाऱ्या काळात हवामान कसे राहील, याची माहिती मिळते. देशमुख यांनी यासह विविध बाबींकडे यावेळी लक्ष वेधले.

काय आहे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’कृत्रिम वस्तूने दर्शविलेल्या बुद्धिमान वर्तनास ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) म्हणतात. ही कृत्रिम वस्तू साधारणत: संगणकच असते. ही संगणक शास्त्रातील एक महत्त्वाची शाखा आहे. या शाखेमध्ये यंत्र शिक्षण, त्यांचे बुद्धिमान वर्तन व परिस्थितीला जुळवून घेण्याची क्षमता आदींचा अभ्यास केला जातो. या शाखेतील संशोधन मुख्यत: स्वयंचलित कार्य (जसे नियोजन, संयोजन, निदान, उत्तरे शोधण्याची क्षमता, हस्ताक्षर, आवाज व चेहरा ओळखण्याची क्षमता) करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा यंत्रांशी निगडित आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ प्रणाली अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, संरक्षण, कॉम्प्युटर गेम्स, संगणक प्रणाली इत्यादीमध्ये वापरली जाते.

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सscienceविज्ञान