शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

स्मार्ट सिटीत सर्वांचा विकास; कुणीही बेघर होणार नाही : नितीन गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 22:06 IST

पूर्व नागपुरात राबविल्या जात असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात कुणावरही अन्याय होणार नाही. या प्रकल्पात ज्यांची जमीन घेऊ त्यांना बाजारभावापेक्षा अधिक मोबदला दिला जाईल. ज्यांची घरे जातील त्यांना दुसरे चांगले घर दिले जाईल. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पात सर्वांचा विकास होईल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली.

ठळक मुद्देस्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व नागपुरात राबविल्या जात असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात कुणावरही अन्याय होणार नाही. या प्रकल्पात ज्यांची जमीन घेऊ त्यांना बाजारभावापेक्षा अधिक मोबदला दिला जाईल. ज्यांची घरे जातील त्यांना दुसरे चांगले घर दिले जाईल. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही. स्मार्ट सिटी प्रकल्पात सर्वांचा विकास होईल, अशी ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली.नागपूर महापालिका, महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान कार्पोरेशन लिमिटेड महाराष्ट्र शासन आणि नागपूर स्मार्ट अ‍ॅन्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड यांच्यावतीने भरतवाडा टी-पॉईंट येथे आयोजित कार्यक्रमात श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटचे नामकरण आणि नागपूर सेफ आणि स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे लोकार्पण, स्मार्ट सिटी अभियांतर्गत प्रोजेक्ट टेंडरशुअर आणि प्रोजेक्ट होम स्वीट होम तसेच अमृत अभियांतर्गत अधिकृत व अनधिकृत स्लम वस्त्यांतील पाणीपुरवठा योजनचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी नितीन गडकरी बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, आमदार कृष्णा खोपडे, सुधाकर कोहळे, डॉ. मिलिंद माने, स्थायी समितीचे अध्यक्ष वीरेंद्र कुकरेजा, सत्तापक्षनेते संदीप जोशी, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधीपक्षनेते तानाजी वनवे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष बाल्या बोरकर,अतिरिक्त मुख्य सचिव व एनएसएससीडीसीएलचे सभापती प्रवीण परदेशी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस.व्ही.आर. श्रीनिवास, पोलीस आयुक्त डॉ. बी.के.उपध्याय, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महापालिका आयुक्त अभिजित बांगर, नासुप्रच्या सभापती शीतल उगले, स्मार्ट सिटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे आदी उपस्थित होते.नितीन गडकरी म्हणाले,स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून भरतवाडा, पारडी,पुनापूर, व भांडेवाडी येथील १७३६ एकर जागेवर १८ महिन्यात सुंदर शहर उभारले जाईल. १ लाख १३ हजार लोकांना याचा लाभ होईल.५२० कोटींचा हा प्रकल्प आहे. यात १०४५ किमी लांबीचे रस्ते, ३६७४ सीसीटीव्ही कॅमेरे, ४३ जलकुं भ, ३४० किलोमीटर लांबीची जलवाहिनी, ६० किलोमीटरची मुख्य जलवाहिनी यासह अन्य प्रकल्पांचा समावेश आहे. स्मार्ट सिटीत आंतरराष्ट्रीय दर्जांच्या सुविधा उपलब्ध केल्या जातील. या प्रकल्पामुळे नागपूर शहराचा चेहरामोहरा बदलणार आहे.मिहान प्रकल्पात ५०हजार युवकांना रोजगार उपलब्ध होत आहे. यातील २७ हजार युवकांना रोजगार मिळाला आहे. वीज प्रकल्पासासाठी आरक्षित असलेल्या १८०एलएलडी पाणी शहराला एप्रिल, मे व जून महिन्यात उपलब्ध होईल. अजनी भागातील मध्यवर्ती कारागृहाच्या जागेवर ८०० कोटींचा परिवहन हब उभारला जाणार आहे. निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.कुणीही बेघर होणार नाही;अचडणी दूर करूस्मार्ट सिटी प्रकल्पामुळे कोणतीही व्यक्ती बेघर होणार नाही. ज्यांची घरे तुटतील त्यांना पक्की घरे बांधुन दिली जातील. अडचणीमुळे प्रकल्प बंद करणे हा पर्याय नाही. सर्व अडचणी दूर केल्या जातील अशी गवही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. स्मार्ट सिटी प्रकल्प हा मोठ्या लोकांचा प्रकल्प असल्याचे सांगितले जात आहे. परंतु हा सर्वसामान्यांचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वोत्तम दर्जांच्या मुलभूत सुविधा उपलब्ध होतील. ६०:४० फार्मूल्यानुसार ज्यांची जमीन ताब्यात घेतली जाईल. त्यांना एफएसआयचा लाभ मिळेल. प्रकल्पामुळे जमिनीच्या किमती वाढतील. प्रकल्पात कुणीही बेघर होणार नाही सर्वांच्या अडचणी सोडविल्या जातील.एक रुपयात वर्षभर ब्रॉडबँड कनेक्टिविटीमुख्यमंत्री म्हणाले, राज्य भरातील शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयात ब्रॉडबँड कन्क्टिविटीची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. यासाठी ‘अर्बन महानेट प्रकल्प’राबविला जात आहे. याची निविदा काढली आहे. राज्यातील सर्व शहरांना स्मार्ट बनविण्यासाठी हा प्रकल्प राबविला जात आहे. यामुळे सर्वसामान्यांना उत्तम दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील.

गोरगरीब लोकांना लाभ होईलस्मार्ट सिटी प्रकल्पाला एकाचाही विरोध नाही. काही लोकांची दुकानदारी बंद होणार म्हणून प्रकल्पाला विरोध करीत आहे. या प्रकल्पामुळे गोरगरीब लोकांना लाभ होणार आहे, म्हणूनच मुख्यमंत्र्यांकडे या प्रकल्पासाठी आग्रह धरला होता. प्रकल्पात जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला दिला जाईल. अमृत योजनेच्या माध्यमातून नागपूर शहराला २५० कोटी मिळाले आहे. यातील १०० कोटी पूर्व नागपुरातील कामावर खर्च केले जाणार आहेत. दहा हजार लोकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्यात आल्याची माहिती आमदार कृ ष्णा खोपडे यांनी दिली. असा असेल स्मार्ट सिटी प्रकल्पपूर्व नागपुरात १७३० एकरवर स्मार्ट सिटी प्रकल्प उभारला जाणार आहे. प्रकल्पावर ५२० कोटींचा खर्च होणार आहे. पार्किंग, पाणीपुरवठा व मलनिस्सारण, सायकल व बाईक ट्रॅक, स्मार्ट रस्ते व दळणवळण व्यवस्था, जॉगिंग ट्रॅक, खेळाची मैदाने, सीसीटीव्ही कॅमेरे, स्मार्ट सदनिका, जागतिक दर्जाचे शिक्षण व आरोग्य सुविधा या ठिकाणी असणार आहे.भांडेवाडी कचरामुक्त होणार भांडेवाडी येथे बायोमायनिंग प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात कचºयावर प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी ३५ कोटींचा निधी दिला आहे. या प्रकल्पामुळे भांडेवाडी कचरामुक्त होणार आहे. अमृत योजनेत २७४ कोटींचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. शहरातील झोनच्या गरजेनुसार पाणीपुरवठा केला जाणार आहे. हा प्रकल्प २४ बाय ७ राहणार आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीSmart Cityस्मार्ट सिटी